लहान वाघोदा उपसरपंचपदी सत्तार पटेल यांची निवड
लहान वाघोदा उपसरपंचपदी सत्तार पटेल यांची निवड
लेवाजगत न्युज सावदा:- सावदा येथून जवळच असलेल्या लहान वाघोदा येथे नुकतीच उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पाटणकर तर मदतनीस म्हणून ग्रामसेवक श्रीकांत पाटील उपस्थित होते. या वेळी सत्तार पटेल यांचा एकमेव अर्ज उपसरपंच पदासाठी दाखल करण्यात आला. त्यामुळे सभेच्या अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच दीपाली चौधरी यांनी सत्तार पटेल यांना उपसरपंचपदी बिनविरोध घोषित केले.
या वेळी सभेचे अध्यक्ष प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच दीपाली जितेंद्र चौधरी होत्या. तर ग्रामपंचायत सदस्य दमयंती शिंदे, फातमा तडवी, वंदना कोलते, रुपाली कोलते, पुजा कोलते, जितेंद्र चौधरी, संदीप कोलते व परीन कुलकर्णी उपस्थित होते. या वेळी नवनिर्वाचित उपसरपंच सत्तार पटेल यांचा सरपंच व सर्व सदस्यांनी सत्कार केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत