Contact Banner

बामणोदच्या दीपाली तळेलेंची मिरारोड येथे उद्योगात भरारी, आदर्श कृषि उद्योजक कृषिसेवक राज्यस्तरीय पुरस्काराने रावेर येथे सन्मान

Bamanod's-Deepali-Talenchi-in-industry-at-Miraroad-honored-with-Adarsh-Krishi-entrepreneur-agriculturalist-state-level-award-at-Raver


बामणोदच्या दीपाली तळेलेंची मिरारोड येथे उद्योगात भरारी, आदर्श कृषि उद्योजक कृषिसेवक राज्यस्तरीय पुरस्काराने रावेर येथे सन्मान

लेवाजगत न्यूज सावदा- जळगाव जिल्ह्याच्या रावेर येथे शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ गौरव मातीचा सन्मान भूमिपुत्रांचा कृषिसेवक राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील भालोद येथील कन्या, बामणोद येथील सुन दीपाली दीपक तळेले यांना आदर्श कृषि उद्योजक कृषिसेवक राज्यस्तरीय पुरस्कार माजी मंत्री, आमदार एकनाराव खडसे व माजी आमदार अरुण पाटील यांच्याहस्ते नुकताच प्रदान करण्यात.

   कोरोनाच्या काळात पतीची नोकरी गेल्याने परिवाराचा चरितार्थ चालविण्यासाठी पदवीधर असलेल्या दीपाली तळेले यांनी ठाणे जिल्ह्यातील मिरारोड येथे अक्षरशः रस्त्यावर बसून भाजीपाला व खान्देशातील मसाले विक्रीच्या व्यवसायाला सुरुवात केली. यात शुन्यातून विश्व निर्माण करुन साई व्हेजिटेबलच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर विदेशात देखील उत्कृष्ट प्रतिचे खान्देशी पदार्थ पोहचवण्याचे कार्य केले. सौ. तळेले यांनी दाखविलेल्या धैर्य व चिकाटीचा अनेक स्तरातून गौरव करण्यात आला. या कार्याची रावेर येथील साप्ताहिक कृषिसेवकचे संपादक कृष्णा पाटील यांनी आयोजिक केलेल्या कृषिसेवक राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याप्रसंगी दीपाली तळेले यांना आदर्श उद्योजक कृषिसेवक पुरस्कार माजी मंत्री आमदार एकनाराव खडसे व रावेरचे माजी आमदार आरुण पाटील यांच्या हस्ते नुकताच रावेर येथील मराठी मंगल कार्यालयात प्रदान केला गेला. यापूर्वी त्यांना अनेक पुरस्कार सन्मानीत करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.