बी.एस.पाटील इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये वेशभूषा स्पर्धा संपन्न
बी.एस.पाटील इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये वेशभूषा स्पर्धा संपन्न
उरण सुनिल ठाकूर -बी.एस . पाटील इंग्लिश मिडियम स्कूल विंधणे येथे वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचे उददे्श विदयार्थ्यांना आपल्या देशातील विविध वेशभूषबददल माहिती करून घेणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेणे हा आहे. या स्पर्धेमध्ये आराध्य थळी, मायरा चित्तमपल्ले, श्रीजा जोशी, मितांश पाटील, शौनक पाटील, शौर्य पाटील, क्रिशा ठाकूर, क्रियांश नवाळी, रूद्रांश कोळी, मोक्षा जोशी, सायरा घरत, जियांश पाटील इत्यादी विदयार्थ्यांनी सहभाग घेतला. आपल्या भारत देशात विविधतेत एकता आहे आणि त्याचे दयोतक ही स्पर्धा आहे, असे मत संस्थेचे अध्यक्ष श्री. कैलास पाटील यांनी व्यक्त केले. या वेशभूषा स्पर्धेत मितांश पाटील प्रथम, मायरा चित्तमपल्ले व श्रीजा जोशी द्वितीय क्रमांक क्रिशा ठाकूर व क्रियांश नवाळी तृतीय क्रमांक प्राप्त केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत