Header Ads

Header ADS

भुसावळ येथे पुन्हा खून ,अज्ञातांनी केला गोळीबार

Murder-again-in-Bhusawal-by-unknown-assailants-in-fired


भुसावळ येथे पुन्हा खून ,अज्ञातांनी केला गोळीबार 

लेवाजगत न्यूज भुसावळ :- शहरातील गजबजलेल्या जाम मोहल्ला भागातील भर चौकातील शालिमार हाॅटेल पुढे असलेल्या डिडि टी या चहाच्या दुकाना जवळ आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास एका व्यक्तीवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करत दोन राऊंड फायर केलेले आहे. यानंतर सदर जखमीला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गोळी लागलेला व्यक्ती हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली असून डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केलेले आहे.






   तहरीन नजीर शेख (वय ३०) रा.भुसावळ असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. भुसावळ शहरात यापूर्वी आफात पटेल नावाच्या तरुणाचा खून झाला होता.


 याप्रकरणातील तो प्रमुख संशयित आरोपी असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. दरम्यान शुक्रवारी दि. १० जानेवारी रोजी तहरीन सकाळी चहा पिण्यासाठी डीडी सुपर कोल्ड्रिक्स आणि चहा येथे चहा घेण्यासाठी आला होता. यावेळी संशयित चार ते पाच संशयित आरोपींनी त्याच्यावर बंदुकीतून पाच फैरी झाडल्या आहेत.

   दरम्यान, गजबजलेल्या जाम मोहल्ला भागातील या घटनास्थळी बाजारपेठ पोलीस ठाण्याचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून बाजारपेठचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांचे सह मोठा फौजफाटा दाखल झालेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.