वाचन संस्कृती व संस्कार जपवणुकीसाठी पुस्तकांची महत्वपूर्ण भूमिका- सुनिता नारखेडे- येवले लिखित काव्यसंग्रह प्रकाशनप्रसंगी-प्रा होले यांचे प्रतिपादन
वाचन संस्कृती व संस्कार जपवणुकीसाठी पुस्तकांची महत्वपूर्ण भूमिका- सुनिता नारखेडे-येवले लिखित काव्यसंग्रह प्रकाशनप्रसंगी-प्रा होले यांचे प्रतिपादन
लेवाजगत न्यूज जळगांव -३ जाने २०२५ , शुक्रवार रोजी क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीच्या औचित्याने जळगांव येथील डॉ अण्णासाहेब जी डी बेंडाळे महिला महाविद्यालय मराठी विभाग व माजी विद्यार्थिनी समिती आयोजित कार्यक्रमात खुबचंद सागरमल विद्यालयाच्या शिक्षिका सुनिता नारखडे -येवले लिखित ' स्त्री कर्तृत्वाची ओवीमाला' व 'शब्दराई' या दोन काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा धांडे सभागृह डॉ अण्णासाहेब जी डी बेंडाळे महिला महाविदयालय येथे प्रा व पु होले ( सुप्रसिद्ध कथाकार व साहित्यिक) यांच्या हस्ते पार पडला.
व. पु. होले यांनी आपल्या मनोगतात सांगीतले कि साहित्य मार्गदर्शक , प्रेरणादायी ,आंनददायी असले पाहिजे व ते 'शब्दराई 'या संग्रहात दिसते तर स्त्री कर्तृत्वाची ओवीमाला या संग्रहात हाताळलेला ओवी प्रकाराचे कौतुक केले. वाचन संस्कृती,संस्कार जपणूकीसाठी पुस्तके विकत घेवून वाचण्याचे , इतरांनाही देण्याचे व चर्चा करण्याचे आवाहन ही केले . प्री वेडिंग सारख्या प्रथा सर्वानी बंद करण्याचे आवाहन केले.
आपल्या "स्त्री कर्तृत्वाची ओवीमाला" या काव्यसंग्रहात कवयित्रींनी महाष्ट्रातील संत परिवारातील, ऐतिहासिक काळातील, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात समाजपरिवर्तन क्षेत्रात क्रियाशील असणाऱ्या तसेच साहित्य, कला, संस्कृतीच्या क्षेत्रात छाट उमटविणाऱ्या प्रतिभासंपन्न महनायिकांची यशोगाभा मांडली आहे. यासाठी त्यांनी 'ओवी' हा छंदप्रकार निवडलेला असला; तरी त्यांनी या छंदप्रकाराचा एक आगळावेगळा आकृतीबंध मराठी कवितेला दिला आहे. तर शब्दराई यात विविध विषयांवरील कविता सोप्या सुलभ भाषेत उत्कृष्ठरित्या शब्दबद्ध केलेल्या आहेत.
या प्रसंगी प्रमुख अतिथी प्रा डॉ गौरी राणे(प्राचार्या अण्णासाहेब जी डी बेंडाळे महिला महाविद्यालय )पी झेड नारखेडे ( सेवानिवृत्त शिक्षक )ए के नारखेडे (जेष्ठ साहित्यिक)प्रा डॉ सत्यजीत साळवे,प्रा संध्या महाजन ,संगिता माळी व युवराज माळी (अथर्व प्रकाशन )विनोदजी बियाणी, मुख्याध्यापीका योगीनी बेंडाळे, प्रदिप भोळे ,निखिल जोगी हे विचारमंचावर उपस्थित होते.प्रास्ताविक व कविता वाचन करुणा महाले यांनी तर ओवी व गीते गायन प्रा ऐश्वर्या परदेशी तर आभार प्रदर्शन प्रा डॉ अनिता कोल्हे यांनी केले. या प्रसंगी प्रा संध्या महाजन, प्रा डॉ सत्यजीत साळवे, प्राचार्या डॉ गौरी राणे, जेष्ठ साहित्यिक श्री ए के नारखेडे, श्रध्दा चौधरी व कवयत्री व लेखिका सुनिता नारखेडे - येवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख वक्ते प्रा डॉ सत्यजीत साळवे व प्रा संध्या महाजन तसेच जेष्ठ साहित्यिक श्री अरविंद नारखेडे यांनी या दोन्ही काव्यसंग्रहांची रसिकांना ओळख करून दिली व जास्तीत जास्त वाचकांपर्यंत हा ओवी प्रकार व प्रासादगुणी कविता पोहचविण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात सहकार्य करणारे अजय पाटील व विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला प्रा डॉ अनिता कोल्हे( क्रीडा क्षेत्र), सायकलपटु कामिनी धांडे ,उडान फाऊंडेशनच्या हर्षाली चौधरी, स्मामिनी फाऊंडशनच्या अध्यक्ष ॲड भारती ढाके, भाग्यश्री पाटील( पोलीस विभाग) , मुख्याध्यापिका साधना लोखंडे यांचा ही सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन ज्योती राणे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी खुबचंद सागरमल विद्यालय, बहिणाई बिग्रेड, अखिल भारतीय लेवा पाटील युवक महासंघ यांचे सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत