Header Ads

Header ADS

३५व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिकांसाठी आवाहन

३५व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिकांसाठी आवाहन

Invitation for entries for the 35th Maharashtra State Marathi Professional Drama Competition


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ३५वी महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा जाहीर झाली असून सांस्कृतिक कार्य संचालनालयाने २० जानेवारी २०२५ पर्यंत व्यावसायिक नाट्यनिर्मात्यांकडून प्रवेशिका मागविल्या आहेत. २५ जानेवारी २०२५ पासून सुरू होणारी ही प्रतिष्ठित स्पर्धा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आणि मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे, असे  सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी सांगत मराठी व्यावसायिक नाट्य संस्थांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी २५ जानेवारी ते १० मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे.


सदर स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी संस्था संचालनालयाच्या वेबसाइटवर https://mahanatyaspardha.com ऑनलाइन उपलब्ध असलेल्या प्रवेश अर्जाचे विहित नमुने भरू शकतात. प्रवेश अर्ज २० जानेवारी २०२५ पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह सादर करणे आवश्यक आहे. अंतिम मुदतीनंतर प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत. तसेच आवश्यक कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशील भरला नसल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही. संस्थांना नाट्य स्पर्धेसाठी असलेल्या सरकारी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे आणि कोणत्याही नियमाचे उल्लंघन केल्यास स्पर्धक संस्था स्पर्धेसाठी अपात्र ठरू शकते.


व्यावसायिक नाट्यसंस्थांसाठी ही स्पर्धा त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याची उत्तम संधी असून, जास्तीत जास्त संस्थांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.