फैजपूर येथे युवानेते धनंजय चौधरी यांची उपस्थितीत एम मुसा श्रमिक कोहिनूर कामगार संघटना जनविकास मल्टीपर्पज सोसायटी तर्फे पत्रकारांचा सत्कार
फैजपूर येथे युवानेते धनंजय चौधरी यांची उपस्थितीत एम मुसा श्रमिक कोहिनूर कामगार संघटना जनविकास मल्टीपर्पज सोसायटी तर्फे पत्रकारांचा सत्कार
लेवाजगत न्यूज फैजपूर -आजचा पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून पत्रकाराच्या लेखणीमध्ये एक मोठी ताकद आहे कारण विधानसभा निवडणुकीत प्रचारार्थ दरम्यान पत्रकारांच्या अनुभव पाहण्यास मिळाला त्यांची आपुलकी अत्यंत चांगल्या प्रकारे वागणूक पाहण्यास मिळाली त्यांच्या लेखणीमध्ये अशी ताकद आहे की सरकार निवडूनही येऊ शकते किंवा पडू शकते असे युवा नेते धनंजय चौधरी यांनी एम मुसा जनविकास मल्टीपर्पज सोसायटी श्रर्मिक कोहिनूर कामगार संघटना व विस्डम इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे संयुक्त दरवर्षीप्रमाणे ६ जानेवारी मराठी पत्रकार दिवस साजरा केला जातो या कार्यक्रमात त्यांनी अध्यक्षस्थानी राहून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपनगराध्यक्ष कलीम खान मणियार ,माजी नगरसेवक महेबुब पिंजारी,काँग्रेस शहराध्यक्ष शेख रियाज, विस्डम इंग्लिश मीडियम स्कूल उपाध्यक्ष इरफान खान ,उर्दू हायस्कूल सावदा चे मुख्याध्यापक शेख सईद शेख ताहेर, जेष्ठ पत्रकार अरुण होले,उमाकांत पाटील उपस्थित होते. या वेळी फैजपू,सावदा,वाघोदा येथील पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार लेवा जगत चे संपादक व्हाईस ऑफ मीडिया डिजिटल विंगचे जिल्हाध्यक्ष श्याम दादा पाटील ,मुबारक तडवी वासुदेव सरोदे, इदू पिंजारी,समीर तडवी ,सलीम पिंजारी, फारुक शेख,संजय सराफ,योगेश सोनवणे ,राजू तडवी, मयूर मेढे,युनूस बाबा पिंजारी आदी पत्रकार उपस्थित होते .कामगार संघटना चे अध्यक्ष मलिक शाकीर ,इरफान शेख मिस्तरी,लुकमान मिस्तरी ,आसीफ मिस्तरी ,सुलतान कुरेशी मिस्तरी ,मोसीन मिस्तरी ,करीम मोमीन ,मिस्तरी सोहेल इंजिनियर ,फिरोज पटेल ,निजाम भाई ,हमित शहा ,सुलेमान तडवी ,मिस्तरी सूत्रसंचालन पत्रकार संजय सराफ तर आभार मलिक शाकीर यांनी केले.यावेळी गवंडी कामगार व अन्य नागरिक मोठ्या संख्येने या छोटेखानी कार्यक्रमाला उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत