रावेर तालुक्यात महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाच्या शाखा स्थापन करा सावदा येथिल बैठकीत समाज बांधवांची मागणी
रावेर तालुक्यात महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाच्या शाखा स्थापन करा सावदा येथिल बैठकीत समाज बांधवांची मागणी
लेवा जगत न्यूज सावदा-येथील डॉ.व्ही जे वारके यांच्या सुश्रुत हॉस्पिटलच्या बेसमेंट परिसरामध्ये महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले यांच्या अध्यक्षतेखाली रावेर तालुक्यातील लेवा समाज असलेल्या बावीस गावांच्या समाज बांधवांची बैठक संपन्न झाल. या बैठकीत जळगावचे माजी नगराध्यक्ष बंडू दादा काळे , नाशिक येथील डॉ प्रमोद महाजन, डॉ मिलिंद पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. दोन तास चाललेल्या बैठकीमध्ये समाजातील व्यसनाधीनता,शेती,व्यापार व बेरोजगार तरुण यांना कसा रोजगार उपलब्ध होईल यावर चिंतन करण्यात आले.
उपस्थित समाज बांधवांनी संगोपन चर्चा करून जे आपले समाज बांधव काही पदावर असतील किंवा कंपन्या असतील त्यांनी आपल्या आपल्या परीने तरुणांना आपल्या सेवेत सामावून घ्यावे आणि निवृत्त अधिकारी कर्मचारी यांनी त्यात्या विषयात मार्गदर्शन करावे जेणे करून त्यांनाही रोजगार मिळेल व आपला आपणालाही कामगार मिळेल असे केल्याने आपला समाज एकसंघ राहील असे यावेळी मान्यवर प्रमुख यांनी उपस्थित केले. याकरिता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये व लेवा समाज असलेल्या गावांमध्ये शाखा स्थापन करून कार्यकारिणी तयार करून नियोजनबद्ध कार्य करत राहायचे असे यावेळी एकमताने ठरले.यावेळी रावेर तालुक्यातील सदर सभेस उपस्थित महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले,कोषाध्यक्ष डॉ मिलिंद पाटील,सल्लागार सदस्य डॉ प्रमोद महाजन नाशिक माजी नगराध्यक्ष बंडू दादा काळे जळगाव, नितीन इंगळे,उद्योजक जळगाव,महासंघाचे खानदेश विभाग संयोजक महेंद्र पाटील व प्रकाश वराडे,महासंघाचे नियुक्त सदस्या, ज्योती महाजन, नीता वराडे, सीमा गाजरे, संगीता भोळे,नीलिमा राणे,जळगाव ,रितेश भारंबे भुसावळ हे उपस्थित होते.
रावेर तालुक्यातील एकूण २० गावचे लेवा पाटीदार समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते . उपस्थितां पैकी अरुण बोरोले , डॉ महाजन, डॉ व्ही जे वार के , अड संदीप भंगाळे, डॉ सुधाकर चौधरी, तरूण उद्योजक रितेश पाटील , बंडू दादा काळे यांनी आपले विचार मांडले.या मीटिंगला मस्कावद येथील प्रवीण वारके सर,देवेंद्र पाटील,संतोष पाटील,महेंद्र पाटील, खिरोदा येथील किशोर चौधरी,प्रतीक नारखेडे,सागर नेहेते,महेंद्र चौधरी,आमोदा येथून उमेश पाटील,थोरगव्हाण येथील विलास चौधरी,योगेश झोपे,उमाकांत बाऊस्कर , नंदकुमार चौधरी,गोविंद चौधरी,युवराज चौधरी,गाडेगाव येथील रामानंद वारके अट्रावल येथील पवन चौधरी,सावदा येथील अजय भारंबे,पत्रकार श्याम पाटील,इंदूर येथील रविन्द्र चौधरी अनेक गावोगावचे कार्यकर्ते उपस्थित होते.
नंदकिशोर पाटील यांनी कार्यक्रमच प्रास्ताविक व आभार मांडले. तर सूत्रसंचालन डॉ.मिलीन्द पाटील यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत