डॉ.बाबासाहेबआंबेडकर जयंती निमित्त सावदा स्टेशन येथे सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न
डॉ.बाबासाहेबआंबेडकर जयंती निमित्त सावदा स्टेशन येथे सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न
लेवाजगत न्यूज सावदा स्टेशन-येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त डॉ .आंबेडकर यांच्या जीवन कार्य तसेच धम्म कार्य या विषयांवर सामान्य ज्ञानपरीक्षा येथील उपासक विद्यारत्न तायडे आणि त्यांचे सहकारी यांनी आयोजित केली. या सामान्यज्ञान परीक्षेचा उद्देश्य म्हणजे आज कालच्या युवा पिढीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याची आणि त्यांनी केलेल्या समाज प्रबोधनाची माहिती व्हावी हा होय. स्पर्धेत एकूण ३५ विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना रोख रक्कमेचे बक्षीस तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनावरील पुस्तक तसेच आकर्षक ट्रॉफी, आयोजकांच्या हस्ते देण्यात आली.
या स्पर्धेत आम्रपाली तायडे हिने पहिला क्रमांक पटकावून रोख रक्कम ₹.८०० व ट्रॉफी, समर वाघ याने दुसरा क्रमांक पटकावून रोख रक्कम ₹.४०० व ट्रॉफी, आणि भाग्यश्री तायडे हिने तिसरा क्रमांक पटकावून रोख रक्कम ₹. २०० व ट्रॉफी ही बक्षीसे मिळविली. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विद्यारत्न तायडे यांचे मित्र धीरज झाल्टे, मनोज वाघ, विलास तायडे, जितीन तायडे, आनंद सुरवाडे, प्रभाकर सोनावणे, विनोद म्हसदे यांचे अमूल्य असे सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत