दहावीचा निकाल उद्या, राज्य मंडळाची घोषणा
दहावीचा निकाल उद्या, राज्य मंडळाची घोषणा
Maharashtra SSC Results Tomorrow-
लेवाजगत न्यूज पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. यंदा दहावीची परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत लवकर घेण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थी पालकांचे निकालाच्या तारखेकडे लक्ष लागले होते. त्यानुसार यंदा दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (१३ मे) दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.when Where and How to check Maharashtra SSC Results Online
राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्यभरातील सुमारे १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. यंदा परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे कॉपीच्या घटनांमध्ये घट झाली आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल दीड टक्क्याने घटलाअसताना दहावीचा निकाल वाढणार की घटणार याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र बोर्ड 10 वी निकाल 2025 : निकाल साईटवर कसा तपासायचा?
https://results.digilocker.gov.in,
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.targetpublications.org
महाराष्ट्र बोर्ड १०वी निकाल २०२५: मोबाईलवर SMS मध्ये कसा समजेल निकाल?
दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आपल्या मोबाइलवरुन देखील दहावीचा निकाल पाहता येणार आहे. अनेकदा निकालाच्या वेळेस वेबसाइट या क्रॅश होतात किंवा इंटरनेट उपलब्ध नसेल तर SSC निकाल हा त्यांना SMS द्वारे पाहाता येणार आहे.SMSद्वारे एसएससीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना “MHSSC” असं टाकून 57766 वर SMS पाठवायचा आहे. त्यानंतर निकाल त्यांच्या फोनवर SMSच्या स्वरुपात येईल.
अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन
दहावीची निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालक यांची अकरावीच्या प्रवेशासाठी अनेक कॉलेजच्या खेटी घालाव्या लागतात. विद्यार्थी आणि पालक यांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र बोर्डानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र बोर्डानं यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबची माहिती बोर्डानं एक प्रसिद्धीपत्रक जारी करून यापूर्वीच दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत