कत्तलीच्या उददेशाने बांधुन ठेवलेल्या दोन गाईची सावदा पोलिसांनी केली सुटका,ऐकावर गुन्हा दाखल
कत्तलीच्या उददेशाने बांधुन ठेवलेल्या दोन गाईची सावदा पोलिसांनी केली सुटका,ऐकावर गुन्हा दाख
लेवाजगत न्यूज सावदा-येथील पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे शहरातील ख्वाजानगर परीसरातील निमजाय माता रोडवरील काटेरी झुडुपांमध्ये दोन गायी हया कत्तल करण्याचे उददेशाने बांधुन ठेवण्यात आलेल्या आहेत अशी माहिती मिळाली असता कार्यवाहीत दोन गायी कत्तलीच्या उद्देशाने आणल्याचे निदर्शनात आले .
सावदा पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल पाटील यांनी तात्काळ पोलीस स्टॉफसह सदर ठिकाणी जावुन छापामारून कारवाई केली.
सदर ठिकाणी गाई हया सावदा शहरातील शेख रसुल शेख चाँद कुरेशी यांने कत्तल करण्याचे उददेशाने आणल्या असल्याची माहिती मिळाली. सदर ठिकाणी पंचनामा करुन ६००००/- रु किंमतीच्या दोन्ही गाई हया ताब्यात घेण्यात आल्या असुन त्यांची वैदयकीय चाचणी करुन त्या सुरक्षीततेकरीताजळगांव येथील बाफना गो शाळा येथे पाठवण्यात आला आहे.
सदर प्रकरणी सावदा पोलीस स्टेशनचे हवालदार निलेश बाविस्कर यांचे फिर्यादीवरुन सीसीटीएनएस गुन्हा क्र. १२५/२०२५ अंतर्गत महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम-१९७६ (सुधारणा २०१५) चे कलम ५(अ), ५(ब), ९, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम-१९६० चे कलम ११(१)(च) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम-१९५१ चे कलम ११९ अन्वये शेख रसुल शेख चाँद कुरेशी रा.ख्वाजा नगर सावदा यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत