Header Ads

Header ADS

भुसावळहुन नंदुरबारकडे जाणारी मालगाडी रुळावरून घसरली


  भुसावळहुन नंदुरबारकडे जाणारी मालगाडी रुळावरून घसरली


लेवाजगत न्युज अमळनेर:- भुसावळहून-नंदुरबारकडे जाणारी मालगाडी १५ मे रोजी दुपारच्या सुमारास अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयाजवळ रुळावरून घसरल्याची घटना घडली. सुमारे दोन वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली.


सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मालगाडीचे लोको पायलट व गार्ड हे पूर्णतः सुरक्षित असून त्यांना कोणतीही इजा झाली नाही, अशी माहिती प्राथमिक स्वरूपात समोर आली आहे. मात्र, अपघातात काही डब्बे रुळावरून घसरून खाली पडल्यामुळे मुख्य रेल्वे ट्रॅकसह शेजारील ट्रॅकचे देखील मोठे नुकसान झाले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.