प्रशांत राणे यांना उद्यान रत्न पुरस्कार
प्रशांत राणे यांना उद्यान रत्न पुरस्कार
लेवाजगत न्यूज चिनावल -कुंभारखेडा ता.रावेर येथील प्रगतीचे शेतकरी प्रशांत कडू राणे यांनी केळी उत्पादनात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना उद्यान रत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे. जुनागड ( गुजरात) कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ ए.आर.पाठक यांचे हस्ते हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
प्रशांत राणे हे कुभारखेडा येथील प्रगतीतिशील शेतकरी आहे गुणवत्ता केळीचे उच्च उत्पादन १००% अधिक तंत्रज्ञानाचा वापर करीत जैन टिश्यू कल्चर रोपांची लागवड तसेच सिंगल व डबल गादी केळी लागवड प्लास्टिक तसेच उच्च प्रतीची केळी निर्यात केल्याबद्दल त्यांना आज ३० मे रोजी १७ व्या स्वदेश प्रेम जागृती संगोष्टी २०२५ या राष्ट्रीय परिषदेत प्रशांत राणे यांना उद्यान रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
प्रशांत राणे यांना जुनागड ( गुजरात) कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ ए.आर.पाठक यांचे हस्ते हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.त्यांच्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत