प्रगतिशील शेतकरी ललित केशव पाटील “उद्यान रत्न २०२५" पुरस्कार प्रदान
प्रगतिशील शेतकरी ललित केशव पाटील “उद्यान रत्न २०२५" पुरस्कार प्रदान
लेवाजगत न्यूज यावल -तालुक्यातील सातोद येथील रहिवाशी प्रगतिशील शेतकरी आणि उद्योग विश्वास भरारी घेऊन नवउद्योजक म्हणून नेहमी परिसरातील तरुणांना एक प्रेरणास्थान असलेले स्पेक्ट्रासिंथ फार्माकेम कंपनी चे संचालक ललित केशव पाटील यांनी शेती व्यवसायात शून्यातून विश्व निर्माण केले. शेती व्यवसायातून त्यांनी कृषी क्षेत्रात नवं नवीन तंत्रज्ञान जैन टिशूकल्चर केळी, गादी वाफा, प्लास्टिक मल्चिंग, डबल ड्रीप, केळी फ्रुट केयर इ.आत्मसात करून उच्च गुणवंत्तेचे उत्पादन घेवून केळी एक्स्पोर्ट करीत आहे. तसेच त्यांनी पपई, टरबुज यासह अनेक पिक घेत असतात. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून पंचक्रोशीतील शेतकरी सुद्धा गुणवत्तेचे उत्पादन घेत आहे.
कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल करून परिसरातील शेतकऱ्यांना सहकार्य करत परिसरात एक आदर्श निर्माण केला आहे त्यामुळे १७ व्या “स्वदेश प्रेम जाग्रीती सांगोष्टी २०२५" भागलपूर,बिहार येथे राष्ट्रीय परिषदेत त्यांना जुनागड कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.ए.आर.पाठक यांच्या हस्ते “उद्यान रत्न २०२५" पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी मंच्यावर डॉ.एच पी सिंग,चेअर्मन - CHAI & DDG Horti- ICAR, New Delhi व इतर मान्यवर उपस्थित होते.
या पुरस्काराबद्दल परिसरात त्यांचे कौतुक होत आहे . ललित पाटील यांचे कार्य परिसरातील युवकांना प्रेरणादायी आहे . त्यांचे कर्तृत्व व प्रतिभाशाली व्यक्तिमत्व लेवा पाटीदार समाजातून पुढे आलेले आहे . त्यांनी त्यांच्या प्रामाणिकपणाच्या व कठोर परिश्रमाच्या साहाय्याने आर. एल. फ्रुट कंपनी त्यांनी स्वतःच्या हिमतीवर सांभाळण्यास सुरुवात केली. गेल्या १३ वर्षापासून ते शेती आणि फ्रुट व्यवसायात अविरत कार्यरत असून आपल्या प्रामाणिक आणि तत्पर कार्यशैलीमुळे व सचोटीच्या व्यवहारामुळे जनमानसांत अत्यंत लोकप्रिय व अत्यंत विश्वासार्ह म्हणून नावलौकिक मिळविला आहे .
शेतकऱ्यांच्या केळीला त्याच्या प्रतीनुसार योग्य भाव देत असल्याने ते सर्वांच्या मनात घर करून आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत