Header Ads

Header ADS

१० हजार नागरिकांच्या सहभागाने ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन भुसावळ येथे साजरा होणार

11th International Yoga Day to be celebrated in Bhusaval with the participation of 10,000 citizens

१० हजार नागरिकांच्या सहभागाने ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन भुसावळ येथे साजरा होणार

लेवाजगत न्यूज जळगाव - आंतरराष्ट्रीय योग दिनाचा यंदा ११ वा वर्धापनदिन आहे. "एक पृथ्वी, एक स्वास्थ्य के लिए योग" या संकल्पनेनुसार, शनिवार, दिनांक २१ जून २०२५ रोजी सकाळी ७.०० वाजता रेल्वे क्रीडांगण, भुसावळ रेल्वे स्थानकासमोर, येथे भव्य योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

11th International Yoga Day to be celebrated in Bhusaval with the participation of 10,000 citizens

या कार्यक्रमाचे आयोजन आयुष मंत्रालय, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय (भारत सरकार), मध्य रेल्वे विभाग भुसावळ आणि जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. कार्यक्रमात केंद्र शासन निर्देशित कॉमन योगा प्रोटोकॉलनुसार सामूहिक योगाभ्यास होणार आहे.

11th International Yoga Day to be celebrated in Bhusaval with the participation of 10,000 citizens

कार्यक्रमाला केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे , जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असून, सर्व शासकीय विभागांतील वर्ग १ व वर्ग २ अधिकारी यांची उपस्थिती असणार आहे.  

    कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे १०,००० नागरिकांच्या सहभागाची व्यवस्था करण्यात आली असून, सर्व नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उपस्थित राहणाऱ्यांचे वय किमान १० वर्षे व कमाल ६० वर्षे वयोगटातील असावे. योगाभ्यासासाठी सैल, आरामदायक पोशाख परिधान करावा आणि स्वतःची योगा मॅट किंवा चटई सोबत आणावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

11th International Yoga Day to be celebrated in Bhusaval with the participation of 10,000 citizens

कार्यक्रमस्थळी पिण्याच्या पाण्याची आणि प्राथमिक उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे.

योग ही प्राचीन भारतीय परंपरेची देणगी असून, सर्वांनी मिळून या उपक्रमात सहभाग घ्यावा व जनसामान्यांमध्ये योगाचे महत्त्व पोहोचवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.