Header Ads

Header ADS

फैजपूर येथिल धनाजी नाना महाविद्यालयत प्राध्यापकांसाठी ओरिएंटेशन तथा शॉर्ट टर्म कोर्स चे आयोजन

 फैजपूर येथिल धनाजी नाना महाविद्यालयत प्राध्यापकांसाठी ओरिएंटेशन तथा शॉर्ट टर्म कोर्स चे आयोजन


Faizpur-Yethil-Dhanaji-Nana-College-Orientation-and-Short-Term-Course-Organization-for-Professors


लेवाजगत न्यूज फैजपूर:-   धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर आणि डॉ. हरिसिंग गौर केंद्रीय विद्यापीठ, सागर (मध्यप्रदेश) येथील मानव संसाधन विकास केंद्र (HRDC) यांच्या संयुक्त विद्यमाने यूजीसीद्वारे प्रायोजित मोफत ऑनलाईन उद्बोधन आणि शॉर्ट टर्म कोर्स चे आयोजन १९ जून ते ३० जून २०२५ या कालावधीत करण्यात आले आहे.

या कोर्ससाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, तामिळनाडू व कर्नाटक या सहा राज्यांतील ११८ प्राध्यापकांनी नोंदणी केली आहे. कोर्स अंतर्गत नवीन शैक्षणिक धोरण, संशोधन, भारतीय ज्ञानपरंपरा, तसेच अध्ययन-अध्यापनात सॉफ्टवेअरचा वापर यासारख्या विषयांवर देशभरातील तज्ज्ञ साधन व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत.

हा कोर्स प्राध्यापकांच्या कॅश (CAS) अंतर्गत पदोन्नती प्रक्रियेस उपयुक्त ठरणार असून शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रो. नीलिमा गुप्ता, कुलगुरू – डॉ. हरिसिंग गौर केंद्रीय विद्यापीठ, सागर या राहणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रो. जगदीश पाटील, अधिष्ठाता – मानव्यविद्या शाखा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, तसेच विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य हे उपस्थित राहणार आहेत.

या कोर्सच्या आयोजनासाठी परवानगी HRDC संचालक डॉ. आर. टी. बेद्रे यांनी दिली असून, संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. या कोर्सचे समन्वयक डॉ. मारोती जाधव असून, डॉ. राजेंद्र राजपूत, डॉ. विजय सोनजे, डॉ. ताराचंद सावसाकडे, डॉ. सीमा बारी हे आयोजन समिती सदस्य म्हणून परिश्रम घेत आहेत.

Faizpur-Yethil-Dhanaji-Nana-College-Orientation-and-Short-Term-Course-Organization-for-Professors

Faizpur-Yethil-Dhanaji-Nana-College-Orientation-and-Short-Term-Course-Organization-for-Professors


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.