Header Ads

Header ADS

रविवारची सुटी बेतली तरुणाच्या जीवावर, दुसरा थोडक्यात बचावला,निंबादेवी धरणावर अंघोळ करताना जळगावचा १८ वर्षीय तरुण बुडाला

 निंबादेवी धरणावर अंघोळ करताना जळगावचा १८ वर्षीय तरुण बुडाला


रविवारची सुटी बेतली तरुणाच्या जीवावर, दुसरा थोडक्यात बचावला

18-year-old-from-Jalgaon-drowned-while-bathing-in-Nimbadevi-dhar


लेवाजगत न्यूज यावल-यावल तालुक्यातील सावखेडासिम जवळील निंबादेवी धरणात जळगाव येथील रामेश्वर कॉलनी भागातील आठ तरुण आले होते.दरम्यान त्यातील एक १८ वर्षीय तरुण हा पोहताना खोल पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले व अंधार पडल्याने शोध मोहिम थांबवण्यात आली.

     सावखेडासिम (ता. यावल) येथून जवळचं सातपुड्याच्या पायथ्याशी निंबादेवी धरण आहे. या धरणावर जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील ८ तरूण आले होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जतीन अतुल वार्डे (वय १८) हा अंघोळीसाठी खोल पाण्यात गेला आणि बुडला. जतीनसह अजुन एक तरूण हा खोल पाण्यात बुडत होता. तेव्हा धरणात अंघोळ करणाऱ्या तरुणांनी समय सूचकता दाखवत मानवी साखळी तयार करून त्याचे केस ओढून खोल पाण्यातून त्याला बाहेर काढून वाचवले. पोलिस पाटील पंकज बडगुजर यांनी यावल पोलिसांना माहिती दिली. यावेळी सहायक फौजदार विजय पासपोळे, हवालदार अर्षद गवळी, मुकेश पाटील, अमित तडवी, संतोष पाटील यांच्या पथकाने अंधार पडेपर्यंत धरणात शोध घेतला मात्र, तरूण मिळून आला नाही व शोध मोहिम थांबवली. सोमवारी सकाळी पुन्हा शोध घेतला जाईल असे पोलिसांनी सांगितले.


18-year-old-from-Jalgaon-drowned-while-bathing-in-Nimbadevi-dhar



धरणस्थळावर जाण्यास पोलिसांची मनाई

सातपुड्याच्या पायथ्याशी अनेक धरण आहेत. सध्या पावसाळा सुरू असून त्या ठिकाणी जाण्याचे रस्ते देखील व्यवस्थित नाही. केव्हा पाऊस येईल धरणाला कधी पाणी वाढेल हे सांगता येत नाही. म्हणून तरुणांनी या स्थळावर जाणे टाळावे. या धरण परिसरात जर कोणी गेल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.