मोठे वाघोदा परिसरात वादळी वाऱ्यामुळे शेतीचे नुकसान!
मोठे वाघोदा परिसरात वादळी वाऱ्यामुळे शेतीचे नुकसान!
लेवाजगत न्यूज – रावेर, दि. ३० जून २०२५ -रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा परिसरात काल दिनांक २९ जून रोजी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः निंभोरा रोडलगत व वाघोदा परिसरातील शेतजमिनींमध्ये पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक पाहणीत स्पष्ट झाले आहे.
आज रावेरचे तहसीलदार बंडू कापसे यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी तलाठी मधुराज पाटील यांना तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांना दिलासा देताना तहसीलदारांनी सांगितले की, "तुमच्या नुकसानाचा अहवाल शासन दरबारी मांडण्यात येईल आणि शक्य त्या सर्व उपाययोजना केल्या जातील."
वादळी वाऱ्यामुळे गावातील रस्त्यांवरही झाडे कोसळली असून, काही ठिकाणी विद्युत तारे तुटल्यामुळे सुमारे ६ तास वीजपुरवठा खंडित झाला होता.
या पाहणीवेळी तलाठी राहुल पाटील, वैभव पाटील, सूर्यकांत देशमुख, जयेश महाजन यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत