आ.अमोल जावळे यांचा तातडीचा पुढाकार : वादळग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश
आ.अमोल जावळे यांचा तातडीचा पुढाकार : वादळग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश
प्रतिनिधी । रावेर, यावल – दि. ३० जून २०२५:- रावेर व यावल तालुक्यात काल आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिके जमीनदोस्त झाली असून अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोलभाऊ जावळे यांनी तातडीने पुढाकार घेत प्रशासनाला त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यांनी नुकसानग्रस्त गावांमध्ये भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी समजून घेण्याचे निर्देश दिले आहेत.
आज विवरे, चिनावल, रोझोदा (रावेर तालुका) व न्हावी (यावल तालुका) या गावांमध्ये प्रशासनाच्या पथकाने प्रत्यक्ष शेतीत जाऊन नुकसानीचा आढावा घेतला.
या पाहणी दौऱ्यात प्रांताधिकारी बबन काकडे, तहसीलदार बंडू कापसे, कृषी अधिकारी चंद्रकांत वाळके, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, तसेच सुरेश धनके, पद्माकर महाजन, सूर्यकांत देशमुख, वासू नरवाडे, प्रवीण वारके, पराग वाघुळदे आदी प्रशासकीय अधिकारी व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना दिलासा देत आ. जावळे म्हणाले,
"शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहणार आहे. कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची मी काळजी घेईन."
शेतकऱ्यांच्या अडचणीवर तात्काळ उपाययोजना व्हाव्यात यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून शासनाला अहवाल पाठवण्याचे काम सुरु आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत