अक्षरनिवासी शास्त्री श्री भक्तीकिशोरदासजी यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त संत रसोईचे आयोजन
अक्षरनिवासी शास्त्री श्री भक्तीकिशोरदासजी यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त संत रसोईचे आयोजन
लेवाजगत न्यूज सावदा- वडतालधाम (गुजरात) येथे अक्षरनिवासी सद्गुरू शास्त्री श्री भक्तीकिशोरदासजी यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त भाविकतापूर्ण वातावरणात संत रसोई चे बुधवार रोजी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सद्गुरू शास्त्री स्वामी श्री धर्मप्रसाददासजी, सद्गुरू शास्त्री श्री भक्तीप्रकाशदासजी व सर्व संत मंडळाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
या निमित्ताने विविध भागांतून संत व भक्तगण वडताल येथे एकत्र आले होते. यावेळी सावदा येथील श्री स्वामीनारायण मंदिराचे कोठारी स्वयंप्रकाशदासजी, शास्त्री धर्मकिशोरदासजी, तसेच स्वामीनारायण गुरुकुलचे उपाध्यक्ष शास्त्री स्वामी अनंतप्रकाशदासजी,स्वामी लक्ष्मीनारायण यांच्यासह अनेक पूजनीय संत उपस्थित होते.
कार्यक्रमात संत रसोईचे आयोजन करून संतांना प्रेमपूर्वक भोजन अर्पण करण्यात आले. तसेच भाविकांसाठी प्रसाद वितरणही करण्यात आले. भक्तिभाव, सेवा आणि नम्रतेच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांचे मन भरून आले.
कार्यक्रमात शास्त्री श्री भक्तीकिशोरदासजी यांच्या जीवनकार्याचा गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला. त्यांच्या अध्यात्मिक सेवेचे स्मरण करत सर्व संत व भक्तांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत