Header Ads

Header ADS

मालधक्क्यावर काम करताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; डोक्यावर JCB चा लोखंडी हुक कोसळल्याने जागीच मृत्यू



मालधक्क्यावर काम करताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; डोक्यावर JCB चा लोखंडी हुक कोसळल्याने जागीच मृत्यू


लेवाजगत न्युज जळगाव: – येथील रेल्वे स्टेशनलगतच्या मालधक्क्यावर काम करत असताना एक दुर्दैवी घटना घडली असून, कैलास रमेश माळी (वय २७, रा. पाळधी, ता. धरणगाव) या कष्टाळू तरुणाचा लोखंडी हुक डोक्यावर कोसळल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवार, १८ जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.



कैलास माळी हा आपल्या लहान भाऊ आणि काकासोबत पाळधी येथे राहत होता. तो मालधक्क्यावर हमाल म्हणून काम करत होता. रोजप्रमाणे बुधवारीही तो कामावर हजर झाला होता. क्रेनवर माल उचलण्याचे काम सुरू असताना अचानक लोखंडी हुक तुटून थेट त्याच्या डोक्यावर पडला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जागीच कोसळला.


सहकाऱ्यांनी त्याला तात्काळ जळगाव शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि हमाल कामगार रुग्णालयात धाव घेतली.

दरम्यान, रेल्वे पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.