Header Ads

Header ADS

"भरधाव वाहनाची उमाळा जवळ धडक; शेतकरी ठार"


"भरधाव वाहनाची उमाळा जवळ धडक; शेतकरी ठार"


लेवाजगत न्युज जळगाव:- शेतातून घरी जात असताना शरद समाधान पाटील (वय ४०, रा. उमाळे, ता. जळगाव) या शेतकऱ्यास भरधाव वाहनाने धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी होवून त्यांचा उपचारापुर्वीच दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जळगाव-जामनेर रस्त्यावरील उमाळा गावाजवळ घडली. धडक दिल्यानंतर वाहन चालक तेथून पसार झाला. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील उमाळे गावात शरद पाटील हे वास्तव्यास असून ते आई, वडील पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्यास होते. शेती काम करुन ते कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. नेहमीप्रमाणे बुधवारी शरद पाटील शेतीच्या कामासाठी शेतात गेले होते. सायंकाळी शेतातून दुचाकीने घरी परतत असताना जळगाव-जामनेर रस्त्यावर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, शरद पाटील गंभीर जखमी होऊन जागेवरच कोसळले. 


दुचाकीस्वार शरद पाटील यांना धडक दिल्यानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला अपघाताची माहिती मिळताची परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी अवस्थेतील शरद पाटील यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत शरद पाटील यांना मयत घोषीत केले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.