Header Ads

Header ADS

तासखेडा येथे विजेच्या धक्याने बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू




तासखेडा येथे विजेच्या धक्याने बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू

लेवाजगत न्युज तासखेडा, ता. रावेर 

(वार्ताहर):-दि. १३ जून रोजी सकाळी सुमारास तासखेडा गावात एक हृदयद्रावक घटना घडली. घरात विजेच्या शॉर्टसर्किटमुळे वडील समाधान अशोक कोळी (वय ३६) आणि त्यांची मुलगी कु. मानवी समाधान कोळी (वय ११) या बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास समाधान यांचे वडील अशोक माधव कोळी घरात कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेल्या तारांवरून रुमाल काढण्यासाठी गेले. दरम्यान, त्या तारेत विद्युत प्रवाह उतरलेला असल्याने त्यांनी रुमाल हातात घेताच जोराचा शॉक बसून ते फेकले गेले.


हे पाहून त्यांचा मुलगा समाधान वडिलांना उचलण्यासाठी धावला. मात्र, तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने तोही तिथेच चिकटून पडला. बाजूला झोपलेली त्यांची मुलगी मानवी देखील वडिलांच्या मदतीसाठी पुढे आली आणि तिलाही विजेचा शॉक बसला.

तिघांनाही तत्काळ सावदा येथील डॉ. सुनील चौधरी यांच्याकडे नेण्यात आले. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना भुसावळ येथील रिदम हॉस्पिटलला हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी समाधान व मानवी यांना मृत घोषित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी ट्रॉमा केअर सेंटरला पाठवण्यात आले.


या अघटित घटनेने गावात शोककळा पसरली असून, ग्रामस्थ, नातेवाईक आणि मित्रपरिवाराने अश्रूंच्या धारेत बाप-लेकीला शेवटचा निरोप दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.