बॉलिवूड अभिनेत्री तबू यांच्या हस्ते नेक्सस मॉलमधील कल्याण ज्वेलर्सच्या नव्या शोरूमचे भव्य उद्घाटन!
बॉलिवूड अभिनेत्री तबू यांच्या हस्ते नेक्सस मॉलमधील कल्याण ज्वेलर्सच्या नव्या शोरूमचे भव्य उद्घाटन!
लेवाजगत न्युज उरण प्रतिनिधी -( सुनिल ठाकूर)
भारताच्या आघाडीच्या आणि विश्वासार्ह दागिन्यांच्या ब्रँडपैकी एक असलेल्या कल्याण ज्वेलर्सच्या नव्या कोऱ्या शोरूमचे उद्घाटन आज नवी मुंबईतील नेरुळ येथील नेक्सस सीवुड्स मॉलमध्ये करण्यात आले. या खास प्रसंगी बॉलिवूड अभिनेत्री तबू यांच्या हस्ते शोरूमचे भव्य उद्घाटन झाले.
या उद्घाटन सोहळ्याला ग्राहकांचा उसळलेला उत्साह आणि मोठी गर्दी दिसून आली. वैविध्यपूर्ण डिझाइन्स, लक्झरी शॉपिंगचा जागतिक दर्जाचा अनुभव आणि आधुनिक ग्राहकांसाठी सुसज्जतेने सादर करण्यात आलेले हे शोरूम कल्याण ज्वेलर्सच्या ब्रँड प्रतिमेला साजेसे ठरले.
उद्घाटनप्रसंगी संवाद साधताना अभिनेत्री तबू म्हणाल्या,
"कल्याण ज्वेलर्सच्या नव्या शोरूमच्या उद्घाटनाचा भाग होणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. या ब्रँडचा आधार विश्वास, पारदर्शकता आणि ग्राहक केंद्रित दृष्टिकोनावर आहे, आणि त्यामुळे ग्राहकांचा नेहमीच भरवसा राहिला आहे."
कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक श्री. रमेश कल्याणरामन म्हणाले,
"या नव्या शोरूमच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या एका सशक्त परिसंस्थेच्या दिशेने पाऊल टाकत आहोत. उत्कृष्ट सेवा, दर्जेदार दागिने आणि पारदर्शक व्यवहार हे आमचे मुख्य मूल्य राहणार आहेत."
उद्घाटनाच्या निमित्ताने खास ऑफर:
10 ग्रॅम सोन्याच्या खरेदीवर 0.5 ग्रॅम सोने मोफत!
तसेच, कल्याण स्पेशल गोल्ड बोर्ड रेट सर्व शोरूममध्ये एकसमान आणि सर्वात कमी दराने लागू!
ग्राहकांना देण्यात येणाऱ्या 4-स्तरीय अॅश्युरन्स सर्टिफिकेटमध्ये शुद्धतेची खात्री, मोफत देखभाल सेवा, स्पष्ट तपशील आणि एक्सचेंज/बायबॅक धोरणांची हमी दिली जाईल.
शोरूममध्ये उपलब्ध हाउस ब्रँड्स:
- मूहूर्त – लग्नासाठी खास दागिने
- मुद्रा – प्राचीन हस्तकला दागिने
- निमह – देऊळ शैलीतील डिझाईन्स
- ग्लो, जिया, अनुकी, अपूर्वा, अंतरा, हेरा, रंग, लीला – हिऱ्याचे आणि रत्नदागिने
नव्या शोरूमच्या माध्यमातून कल्याण ज्वेलर्सने ग्राहकांसाठी दागिन्यांच्या खरेदीचा अनुभव अधिक समृद्ध व वैशिष्ट्यपूर्ण करण्याचे पाऊल उचलले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत