रावेर-यावलसाठी ‘बफर स्टॉक’मधून खत साठा उद्यापासून उपलब्ध- आ.अमोल जावळेंच्या पाठपुराव्याला यश
रावेर-यावलसाठी ‘बफर स्टॉक’मधून खत साठा उद्यापासून उपलब्ध- आ.अमोल जावळेंच्या पाठपुराव्याला यश
लेवाजगत न्यूज प्रतिनिधी | मुंबई – दि. ३० जून २०२५:- खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर रावेर मतदारसंघातील शेतकऱ्यांना सध्या युरिया व डीएपी खताचा तीव्र तुटवडा जाणवत होता. लिंकिंग प्रणालीमुळे अनेक शेतकऱ्यांना वेळेत खत मिळत नसल्याने शेतीचे नियोजन कोलमडू लागले होते.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोलभाऊ जावळे यांनी जळगाव जिल्हाधिकारी व राज्याचे कृषी मंत्री ना. माणिकराव कोकाटे यांच्याकडे तातडीने नॉन-लिंकिंग खत उपलब्ध करून देण्यासाठी निवेदनाद्वारे ठोस पाठपुरावा केला होता.
या पाठपुराव्याला यश येत, रावेर-यावलसाठी उद्या ‘बफर स्टॉक’मधून युरिया व डीएपी खताचा साठा अधिकृतपणे रिलीज होणार आहे. यामुळे लिंकिंग नसलेल्या शेतकऱ्यांनाही खत सहज उपलब्ध होईल, आणि खरीप हंगामावर होणारे संभाव्य नुकसान टळण्यास मोठी मदत होणार आहे.
आ. जावळे यांनी सांगितले की,
"शेतकऱ्यांचे प्रश्न हे माझे वैयक्तिक प्रश्न आहेत. वेळेवर खत उपलब्ध होणे ही शेतकऱ्यांची गरज असून, त्यासाठी मी शासन दरबारी नेहमीच आवाज उठवत राहीन."
या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक शेतकऱ्यांनी आमदार जावळेंच्या तातडीच्या पुढाकाराबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
महत्त्वाचे:
- खत साठा उद्यापासून उपलब्ध
- नॉन-लिंकिंग शेतकऱ्यांनाही लाभ
- खरीप हंगामात वेळेवर खत पुरवठा
शासनाच्या या निर्णयामुळे रावेर-यावल परिसरातील शेती कार्याला गती मिळणार असून, आगामी हंगामासाठी शेतकऱ्यांचा आत्मविश्वासही वाढणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत