बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग चौपदरी करणात येणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी जाणून घेतल्या समस्या
बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग चौपदरी करणात येणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी जाणून घेतल्या समस्या
लेवाजगत न्यूज फैजपूर:- राष्ट्रीय महामार्ग बुऱ्हाणपूर - अंकलेश्वर रस्ता चौपदरीकरण संदर्भात प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यसाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे घेतली फैजपूर (यावल) येथे बैठक संपन्न झाली.
बुऱ्हानपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग एनएच७५३बी तळोदा जंक्शन जवळ सुरु होणारा असून तळोदा - शिरपूर - चोपडा - यावल - फैजपूर - सावदा - रावेर या महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेलगत असलेल्या २४० किमी महामार्गाच्या चौपदरीकरण मंजूर झालेले असून याबाबत जमीन संपादन व इतर प्रक्रिया प्रगतीपथावर असून, सदर महामार्गाच्या चौपदरीकरण बाबतीत भूसंपादन होत असलेले शेतकरी व स्थानिक नागरिकांच्या अनेक समस्या येत असल्याने आज फैजपूर तालुका यावल येथील शुभ दिव्य लॉन वर आयोजित मिटिंग केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार अमोल हरिभाऊ जावळे,भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन संबंधितांच्या सर्व समस्या व मागण्या जाणून घेतल्या व याबाबत लवकरच योग्यती कार्यवाही करून पाठपुरावा करणे बाबत आश्वासन दिले
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व स्थानिक सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि चोपडा, यावल व रावेर तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत