Header Ads

Header ADS

गिरीश (गोविंदा) चौधरी यांचा पोलीस अधीक्षक कार्यालयात गौरव

 

Girish-(Govinda)-Chowdhary-honored-at-the-office-of-the-Superintendent-of-Police-

गिरीश (गोविंदा) चौधरी यांचा पोलीस अधीक्षक कार्यालयात गौरव
समाजसेवा व पोलीस विभागातील समन्वयाचे केले कौतुक

लेवाजगत प्रतिनिधी जळगाव दि. १७ जून २०२५:- खिरोदा (ता. रावेर) येथील गिरीश (गोविंदा) जनार्दन चौधरी यांनी समाजकार्य करत असताना पोलीस प्रशासनाला सतत मदत केली. जनसेवेची भावना ठेवून त्यांनी सावदा पोलीस ठाण्याशी सलग समन्वय साधत समाज व पोलिसांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण केले. त्यांच्या या कार्याची पोलीस प्रशासनाने दखल घेत पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांचा गौरव केला.

दि. १७ जून रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव येथे मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते गिरीश (गोविंदा) चौधरी यांना सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

सावदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चौधरी यांनी विविध समाजोपयोगी उपक्रमात सहभाग घेतला.

गिरीश चौधरी यांनी सन्मान स्वीकारताना सर्व पोलीस प्रशासनाचे, तसेच विशेषतः विशाल पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले.

या गौरवामुळे युवकांमध्ये समाजकार्यासाठी प्रेरणा निर्माण झाली असून, पोलीस आणि समाज यामधील बंध अधिक दृढ होण्यास हातभार लागणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.