Header Ads

Header ADS

आमोद्या जवळ अपघाताची मालिका सुरूच !सोमवारी ट्रक तर आज मंगळवारी बस घसरली

 

आमोद्या जवळ अपघाताची मालिका सुरूच !सोमवारी ट्रक तर आज मंगळवारी बस घसरली

*आमोद्या जवळ अपघाताची मालिका सुरूच !सोमवारी ट्रक तर आज मंगळवारी बस घसरली >>* https://www.lewajagat.com/2025/07/The-series-of-accidents-near-Amodya-continues-A-truck-fell-on-Monday-and-a-bus-fell-on-Tuesday..html


लेवाजगत न्यूज आमोदा (ता. यावल)येथील मोर नदीजवळ गेल्या एक महिन्याच्या अंतरात हा सोमवारी खताचा ट्रक तर मंगळवार सकाळी संभाजी नगर डेपोची लालपरी बस गतिरोधक जवळ घसरून अपघात झाला. 

सोमवारी प्रशासनाने गतिरोधक टाकलेल्या ठिकाणी पांढरे पट्टे मारले. परंतु  रविवारी दोन व सोमवारी अपघात, अपघात एकाच ठिकाणी झाले.तर आज मंगळवार सकाळी बस घसरून अपघात झाला सुदैवाने जीवित हानी टळली.

The series of accidents near Amodya continues! A truck fell on Monday, and a bus fell on Tuesday.


सोमवारी झालेल्या अपघातात चालकाचे म्हणणे की, आम्ही ब्रेक मारला ब्रेक लागला पण गाडी सरकत बाजूला गेली. म्हणूनच रस्ता हा निसटता झालेला आहे. आता तर या मार्गावरुन बैलगाडी नेण्यासाठी सुद्धा शेतकरी विचार करत आहे. कारण बैलांचे सुद्धा पाया रस्त्यावरून सटकत आहे. सोमवारी आमोदा येथे संध्याकाळी ४ वाजता मालवाहू ट्रक (टीएम ८४ एम ७६७१) खते घेऊन चालली असता ब्रेक लावल्यावर सरकत जाऊन रस्त्याच्या कडेवर मातीत जाऊन रुतल्याने दुर्घटना टळली.

The series of accidents near Amodya continues! A truck fell on Monday, and a bus fell on Tuesday.


  आज सकाळी छत्रपती संभाजीनगर डेपोची बस क्रमांक एमएच १४ एल एक्स ८६११ही छत्रपती संभाजी नगर येथून बऱ्हाणपूर येथे जात असताना आमोद्या जवळच  रस्त्याच्या साईडला अपघात प्रवण क्षेत्र लावलेला बोर्ड ला धडक दिली व गतिरोधका जवळ घसरली व बाजूला खोलचारीत फसली सुदैवाने कोणालाही प्रवाशाला इजा झाली नाही. आज पर्यंत या आमदा परिसरात लहान-मोठे 22 अपघात झाले असून प्रशासनाने या गोष्टीकडे या वळण रस्त्यावरती लक्ष देऊन कार्य करावे.

या महामार्गावर प्रशासनाने व ठेकेदारांनी योग्य ती उपाययोजना करून रस्त्याने वाहन सुरळीत कसे जाईल याची उपायोजना करावी असे नागरिकात व वाहन चालकात चर्चा होती.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.