विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनाबरोबर अध्यात्मिकता जोपासावी:- ज्येष्ठ समाजसेवक , प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे
विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनाबरोबर अध्यात्मिकता जोपासावी:- ज्येष्ठ समाजसेवक , प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे
लेवाजगत न्युज उरुळीकांचन: विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय ठेवून ध्येयपूर्तीसाठी व्यसनमुक्त राहून प्रयत्नांची पराकाष्टा करावी. ज्ञानार्जन करताना भौतिक,लौकिक बाबीकडे जास्त लक्ष केंद्रित करू नये. फक्त आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करावे. तसेच थोरामोठ्यांचा , गुरुजनांचा आदर सन्मान करावा ,त्यांचा आदर्श घेऊन जीवनामध्ये पथिक व्हावे. तसेच विद्यार्थ्यांनी अध्यात्मिकता आत्मसात करून जीवनात शांतता, आनंद व सकारात्मकता निर्माण करावी.
अध्यात्मामुळे जीवनाचे रहस्य, उद्देश्य ,अर्थ आणि उच्च शक्तीची आपल्याला जाणीव होते. आत्मिक शांतीसाठी विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनाजवळ बरोबर आध्यात्मिकता जोपासावी असे मत ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार हिंदू रत्न डॉ. रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या उरुळी कांचन शाखेच्या वर्धापन दिन व दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभाचे आयोजन येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार , लोकमंगल पतसंस्थेचे सल्लागार व पद्मश्री डॉ. मणी भाई देसाई मानव सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ रवींद्र भोळे होते. यापुढे आपले मत प्रतिपादन करताना डॉ. रवींद्र भोळे म्हणाले की लोक मंगल समूहाचे कार्य हे विविधांगी असून सर्व समूह समर्पित भावनेने कार्य करीत आहे. उरुळी कांचन लोकमंगल पतसंस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात हे कौतुकास्पद आहे. तसेच या वर्धापन दिनानिमित्ताने त्यांनी सर्व सभासदांना शुभेच्छा दिल्या आणि गुणवंत विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक कार्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.याप्रसंगी प्रास्ताविक करताना संस्थेचे संचालक शिवाजी माळी सर म्हणाले की
लोकमंगल ही एक संस्था किंवा एक समूह नाही तर सामाजिक चळवळ म्हणून कार्य करत आहे. लोकमंगलच्या सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक कार्याची माहिती दिली.
कार्यक्रमाला अनेक मान्यवरांसह पुणे विभागीय अधिकारी कमलाकर पाटील, उरुळी कांचनचे शाखाधिकारी अभिजीत साखरे, लोणी काळभोर शाखेचे शाखाधिकारी मारुती चौगुले, गुलटेकडी शाखेच्या शाखाधिकारी लक्ष्मी माळी, सासवडच्या शाखाधिकारी स्वाती बोरकर, पत्रकार सुनिल तुपे, सल्लागार नंदकुमार मुरकुटे, अशोक कदम, परिघा कांचन, शुभांगी परिट, अक्षदा कांचन, अलका मदने, संस्थेचे कर्मचारी मयुरी बोडके, सोनाली वाले, अनिकेत जगताप, महेश फुलझळके, सभासद ताराचंद तलरेजा, कर्मचारी वृंद, सभासद, सल्लागार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संचालक शिवाजी माळी यांनी केले तर सूत्रसंचालन अमोल भोसले यांनी केले आभार शाखाधिकारी अभिजीत साखरे यांनी आभार मानले.लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था शाखा उरुळी कांचनचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न
कोणत्याही टिप्पण्या नाहीत