डोंगरकठोऱ्यात बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू – केळीच्या बागेत आढळले प्रेत
डोंगरकठोऱ्यात बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू – केळीच्या बागेत आढळले प्रेत
✍️लेवाजगत न्युज प्रतिनिधी यावल-तालुक्यातील डोंगरकोठारा शिवारात काही दिवसांपासून मादी बिबट्या व तिचे पिल्लू शेतकऱ्यांना दिसत होते. या पैकी अंदाजे साडेसात महिन्यांच्या वयाचे एक पिल्लू रविवारी सकाळी शिवारातील केळीच्या बागेत मृतावस्थेत आढळून आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पिल्लूचा मृतदेह आढळताच ग्रामस्थांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. यावल वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे, वनपाल तडवी यांच्यासह वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृत पिल्लूचे शवविच्छेदनासाठी तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
सदर भागात काही दिवसांपूर्वी मादी बिबट्या व तिचे पिल्लू फिरताना शेतकऱ्यांनी पाहिले होते. मात्र रविवारी सकाळी अचानक पिल्लू मृतावस्थेत आढळल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाकडून पिल्लाच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत