Header Ads

Header ADS

फैजपूर भुसावळ रोड वरील पाडळसा गावा नजीक बस बाईक अपघातात एक ठार तर दोन गंभीर जखमी

 फैजपूर भुसावळ रोड वरील पाडळसा गावा नजीक बस बाईक अपघातात एक ठार तर दोन गंभीर जखमी

One killed, two seriously injured in bus-bike accident near Padalsagava on Faizpur-Bhusaval Road


लेवाजगत न्यूज फैजपूर ( प्रतिनिधी ) :- रविवार संध्याकाळी फैजपूर भुसावळ रोड वरील पाडळसा गावा नजीक वळणावर, मराठा मटण हॉटेल जवळ मोटरसायकल ( बुलेट ) क्रमांक एम.एच.१९ इ.एफ.७७०४ व एस.टी.बस क्रमांक एम.एच.१४ एम.एच.१०८३ नंबर ची बसचा समोरासमोर धडस झाली. यामध्ये मोटर सायकल  वर तीन जण स्वार होते.त्यामधील मयूर श्रीराम गवळी  जागीच ठार झाला. तर जयेश सुधाकर पाटील व चिरायू मनोज गोहर या दोघा जखमींना जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये औषधोपचारासाठी पाठविण्यात आले. त्यातील एक जण मृत्यूशी झुंज देत आहे.


Series of accidents in Amodya: 4 vehicles collide within 60 meters, fortunately no loss of life

Series of accidents in Amodya: 4 vehicles collide within 60 meters, fortunately no loss of life


   सदर एस. टी. बस. ही रावेर डेपोची असून पंढपुर वरून रावेरला जात होती. तर मोटर सायकल ( बुलेट ) ही फैजपूर वरून भुसावळ कडे जात असतांना अपघात झाला. अपघातात मयूर श्रीराम गवळी वय ३० मयत झालेला आहे. तसेच मयत आणि दोघे जखमी शिवाजी नगर जळगाव येथील रहिवासी आहे. सदरील घटना ज्या ठिकाणी घडली त्याच ठिकाणी यावर्षात सात ते आठ वेगवेगळ्या अपघातात लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे.पाडळसा गावाजवळील वळणावर अपघाताच्या घटना घडत आहे त्या ठिकाणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेणे गरजेचे आहे.  सदर अपघाता ठिकाणी एस.टी आगर संबंधीत अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.