Header Ads

Header ADS

नेरी नाका येथे लक्झरी बसमध्ये अपघात; एक प्रवासी गंभीर जखमी

 


नेरी नाका येथे लक्झरी बसमध्ये अपघात; एक प्रवासी गंभीर जखमी

लेवाजगत न्युज जळगाव :- शहरातील नेरी नाका येथे शनिवारी (दि. २८ जून) सकाळी ८ वाजता लक्झरी बसमध्ये चढत असताना चालकाच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या अपघातात एक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शनिवारी रात्री ११ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


प्राप्त माहितीनुसार, शिवाजी कडू सोंळके (वय ३८, रा. कोल्हेव्हावी, ता. यावल, जि. जळगाव, सध्या रा. पालघर) हे कल्याण येथे जाण्यासाठी लक्झरी बसस्थानकावर उभे होते. सकाळी ८ वाजता एमएच १९ सीवाय १४१९ क्रमांकाच्या लक्झरी बसच्या चालकाला त्यांनी कल्याणसाठी विचारणा केली. होकार मिळाल्यावर शिवाजी सोंळके हे बसमध्ये चढत असताना चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडला आणि ते गंभीर जखमी झाले.


घटनेनंतर त्यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर रात्री ११ वाजता त्यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून लक्झरी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ योगेश जाधव करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.