Header Ads

Header ADS

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष पैलवान आण्णा सखाराम मोरे यांचे निधन



वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष पैलवान आण्णा सखाराम मोरे यांचे निधन

लेवाजगत न्युज पाचोरा-भडगाव:- नगरदेवळा स्टेशन येथील रहिवासी व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष पैलवान आण्णा सखाराम मोरे (वय 62) यांचे आज, रविवार दिनांक 29 रोजी सकाळी 5.30 वाजता अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मोरे यांनी सामाजिक, राजकीय व क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान दिले होते. ते अत्यंत प्रेमळ, मनमिळावू स्वभावाचे आणि जनसामान्यांचे नेते म्हणून ओळखले जात. त्यांच्या निधनाने तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीने एक अनुभवी आणि समर्पित नेतृत्व गमावले आहे.

अंत्ययात्रा आज दुपारी 3 वाजता राहत्या घरी, नगरदेवळा स्टेशन येथून निघणार आहे.

लेवाजगत परिवारातर्फे त्यांच्या पवित्र आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.