परमपूज्य अक्षयनिवासी शास्त्री भक्तिकिशोरदासजी यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली कार्यक्रम
परमपूज्य अक्षयनिवासी शास्त्री भक्तिकिशोरदासजी यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली कार्यक्रम
लेवाजगत न्यूज सावदा (ता. रावेर) –स्वामिनारायण संप्रदायातील सर्वांचे लाडके व अध्यात्मिक उन्नतीचे प्रेरणास्थान परमपूज्य अक्षयनिवासी शास्त्री भक्तिकिशोरदासजी यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त, २८ जून रोजी भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
शनिवार सकाळी सावदा येथिल स्वामिनारायण मंदिरात महापूजा संपन्न झाली. या पूजेमध्ये गितेश नेहते, वेदांत देवकर, ईशान पाटील व ईश्वर नेमाडे या युवा मंडळातील कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन सेवा केली. महापूजेचे पावन नेतृत्व शास्त्री स्वामी विश्वप्रकाशदासजी यांच्या उपस्थितीत झाले.
दुपारी मातोश्री वृद्धाश्रम, जळगाव येथे वृद्धांना प्रेमपूर्वक भोजन व प्रसाद वाटप करण्यात आले. हा उपक्रम भक्तिभावाने पार पडला.
या वेळी मंदिराचे कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदासजी, तसेच शास्त्री स्वामी धर्मकिशोरदासजी, अनंतप्रकाशदासजी, विश्वप्रकाशदासजी, सत्यप्रकाशदासजी आणि नित्यप्रकाशदासजी हे प्रमुख संत मंडळी उपस्थित होती.
शास्त्रीजींवर अपार प्रेम करणारे असंख्य हरिभक्त, पंचक्रोशीतील श्रद्धावान मंडळी सकाळपासूनच मंदिर परिसरात दाखल झाले होते.
सायंकाळी ४ ते ७ या वेळेत मंदिरात ‘स्वामिनारायण धुन’ अखंड गात पार पडली. मंदिराच्या विश्वस्त मंडळासह सर्व हरिभक्तांनी या भक्तिपूर्ण वातावरणात सहभागी होऊन, शास्त्रीजींच्या पावन आठवणींना श्रद्धांजली अर्पण केली.
शास्त्री भक्तिकिशोरदासजी यांनी अध्यात्म, सेवा, प्रेम आणि सद्विचाराचा संदेश दिला. त्यांच्या पवित्र कार्याची आठवण आज सर्वांच्या मनात पुन्हा एकदा जागृत झाली.
॥ जय स्वामिनारायण ॥
॥ शास्त्री भक्तिकिशोरदासजी अमर रहें ॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत