पिंपरूड येथील मातोश्री फाउंडेशन तर्फे गुणवंतांचा सत्कार
पिंपरूड येथील मातोश्री फाउंडेशन तर्फे गुणवंतांचा सत्कार
लेवाजगत न्यूज फैजपूर-यावल तालुक्यातील पिंपरुड येथील मातोश्री फाउंडेशन तर्फे गेले दहा वर्षे झाले दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात .यावर्षी सुद्धा मातोश्री फाउंडेशन तर्फे पिंपरूड परिसरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील फेब्रुवारी व मार्च २०२५ दरम्यान घेण्यात आलेल्या १०वी व १२ वी परीक्षेत शाळेनिहाय प्रथम क्रमांक आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार रविवार दि २२ रोजी फैजपूर येथे स्वामी समर्थ मंगल कार्यालयात सकाळी दहा वाजता घेण्यात आला.
प्रमुख पाहुणे एस . डी . भिरूड अध्यक्ष जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी व एस जे तळले मुख्याध्यापक कुसुमताई चौधरी विद्यालय फैजपूर व दिव्य मराठी वृत्तपत्राचे पत्रकार व ज्येष्ठ शिक्षक श्री संदीप चौधरी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले .प्रास्ताविक पर भाषण जनार्दन जंगले अध्यक्ष मातोश्री फाउंडेशन यांनी केले त्यानंतर भिरूड सर यांनी विद्यार्थ्यांनी आता मिळालेल्या यशामुळे मोहून न जाता भविष्यात येणाऱ्या आव्हानांना स्वीकारा असे त्यांनी सांगितले .कुसुमताई चौधरी विद्यालय फैजपुर चे मुख्याध्यापक तळले सर, भारत विद्यालय न्हावी चे मुख्याध्यापक यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सर्व परिसरातील शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक , विद्यार्थी, पालक , मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन श्रीमती वैशाली चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन व्ही ओ चौधरी यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मातोश्री फाउंडेशनचे उपाध्यक्ष चंद्रकांत जंगले , बाळकृष्ण खडसे , डॉ भूषण जंगले ,शालिनी चौधरी ,मधुबाला जंगले, श्री शिरीष टोके, युवराज लोधी,यशवंत वारके यांनी प्रयत्न केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत