जळगाव तालुक्यातून तेरा वर्षीय मुलाचे अपहरण
जळगाव तालुक्यातून तेरा वर्षीय मुलाचे अपहरण!
लेवाजगत न्यूज | जळगाव | प्रतिनिधी दि. २२ जून २०२५-जळगाव तालुक्यातील एका गावात एक धक्कादायक प्रकार घडला असून, एका १३ वर्षीय मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलगा घरातून बिस्कीट आणायला जातो असे सांगून निघून गेला, मात्र तो परतलाच नाही.
ही घटना १९ जून रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. मुलगा आपल्या कुटुंबासोबत गावात वास्तव्यास होता. बिस्कीट घेऊन येतो असे सांगून तो घरातून बाहेर पडला, परंतु त्यानंतर तो परतला नाही. कुटुंबीयांनी नातेवाईक, शेजारी व गावात सर्वत्र शोध घेतला, मात्र मुलाचा काहीही ठावठिकाणा लागला नाही.
अखेर २१ जून रोजी दुपारी २ वाजता मुलाच्या पालकांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शामकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत