Header Ads

Header ADS

प्रशासनाने जनतेच्या समस्या केंद्रस्थानी ठेवाव्यात : आमदार अमोलभाऊ जावळे


 प्रशासनाने जनतेच्या समस्या केंद्रस्थानी ठेवाव्यात  : आमदार अमोलभाऊ जावळे


लेवाजगत न्युज यावल:-

“प्रशासनाने नागरिकाभिमुख दृष्टीकोन स्वीकारल्यास शासन आणि जनतेमधील दुरावा निश्चितच कमी होईल. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केवळ फाईलींवर सही करण्यापुरते मर्यादित न राहता, प्रत्यक्ष जनतेशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेण्याची गरज आहे. जनतेच्या समस्या व गरजा या त्यांच्या कार्याचा मुख्य केंद्रबिंदू असल्या पाहिजेत. 

  शासनाच्या विविध योजना, सेवा आणि सुविधा या समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी समाधान शिबिरांसारखे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याने अशा उपक्रमांमध्ये सक्रिय आणि संवेदनशील सहभाग नोंदवावा” असे प्रतिपादन आमदार अमोल जावळे यांनी केले. 



यावल तालुक्यातील महसूल मंडळ बामणोद अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे आयोजन दिनांक १४  जून रोजी बामणोद येथील ओम मंगल सभागृहात करण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आमदार जावळे बोलत होते. या शिबिरात एकाच छताखाली २५ शासकीय विभागांच्या सेवा उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. या उपक्रमातून एकूण १०४३ लाभार्थ्यांना थेट सेवा देण्यात आल्या.



तहसीलदार मोहनमला नाझीरकर यांनी “शासन आपल्या दारी” या संकल्पनेचा उल्लेख करत सांगितले की, ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी संपूर्ण प्रशासन यंत्रणा कटिबद्ध आहे. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी मनापासून परिश्रम घेतले असून, नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यात यश आले आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हिरालाल चौधरी यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, या योजनांचा लाभ सर्वसामान्य शेतकरी व ग्रामस्थांना मिळत असून, ही संकल्पना खऱ्या अर्थाने जनतेच्या हिताचे कार्य करत आहे. तर कृषी विभागाचे व्ही.टी. बडगुजर यांनी केळी पिकावरील ‘पनामा’ या रोगासंदर्भात सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे मार्गदर्शन केले.


लाभार्थ्यांना मिळालेल्या प्रमुख सेवा – विभागनिहाय तपशील:

महसूल विभाग 

जिवंत 7/12- 162

 ई हक्क नोंदणी -143

म.ज.म.अ. 155 दुरुस्ती -11


मतदार यादी अद्ययावतीकरण

 नविन मतदार नोंदणी( form no. 6 ) -31

मयताचे नाव कमी करणे( form 7) -14

 मतदार यादीत नाव दुरुस्ती(form 8).  -6

संजय गांधी योजना DBT प्रक्रिया करणे लाभार्थी-201

आरोग्य तपासणी शिबिरचा लाभ-59

तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांचे मार्फत दिलेल्या सेवा- 42

पुरवठा शाखा -शिधापत्रिका लाभ- 94

सेतू केंद्रमार्फत दिलेले लाभ

उत्पन्न दाखले- 72

जातीचे दाखले-79

वय अधिवास व रहिवास दाखले- 68

जननी सुरक्षा योजना लाभ- 35

लेक लाडकी योजना- 7

ICDS योजना- 19


या शिबिरास आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार, तालुका कृषी अधिकारी वारे, हिरालाल चौधरी, विलास चौधरी, डॉ.नरेंद्र कोल्हे, योगराज बऱ्हाटे, उमेश पाटील आदी मान्यवर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.