सावदा बसस्थानकात अंगणवाडी सेविकेच्या गळ्यातील सोनं चोरीला -एक महिला अटकेत
सावदा बसस्थानकात अंगणवाडी सेविकेच्या गळ्यातील सोनं चोरीला -एक महिला अटकेत
लेवाजगत न्यूज प्रतिनिधी सावदा:- (दि. २१ जून २०२५) सावदा येथील मुख्य बसस्थानकावर शुक्रवारी सकाळी झालेल्या चोरीच्या घटनेने एकच खळबळ उडाली. अंगणवाडी सेविका मीनाक्षी चुडामण चौधरी यांच्या गळ्यातील सुमारे ८० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी लंपास केले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका महिलेला अटक केली आहे.
सावखेडा बु. येथील मीनाक्षी चौधरी या सकाळी ११ वाजेच्या सुमारास बसने जळगावला जाण्यासाठी सावदा बसस्थानकात आल्या होत्या. त्या बसमध्ये चढत असताना गर्दीत त्यांच्यामागे उभ्या असलेल्या हसीना जहागीर तडवी (वय ५५, रा. लोणी फुकटपुरा, ता. बुऱ्हाणपूर) हिने गळ्यातील मंगळसूत्र ओढून चोरी केली.
घटनेनंतर मीनाक्षी चौधरी यांनी सावदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तत्काळ तपास करत पोलिसांनी हसीना तडवी हिला अटक केली असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल उमेश पाटील करत आहेत.
दरम्यान, सावदा बसस्थानक परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अशा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या तीन-चार महिन्यांत पाचपेक्षा अधिक प्रकरणे समोर आली असून प्रवाशांनी सुरक्षेसाठी अधिक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
बसस्थानकातील काही सीसी टीव्ही बंद
सावदा बस स्थानकात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे कधी चालू तर कधी बंद असतात तर त्यातील निम्मे कॅमेरे बंद असल्याने प्रवासात धर्मात चोरीचे प्रमाण यामुळे वाढत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे तरी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बस स्थानकात लावलेले संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावे म्हणजे थोडाफार काळा बसेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत