Contact Banner

चिनावलमध्ये ३५०० केळी झाडांची अज्ञातांकडून तोड – लाखो रुपयांचे नुकसान; एनएसयूआयकडून कडक कारवाईची मागणी

3500 banana trees uprooted by unknown persons in Chinaval, causing damage worth lakhs of rupees


चिनावलमध्ये ३५०० केळी झाडांची अज्ञातांकडून तोड – लाखो रुपयांचे नुकसान; एनएसयूआयकडून कडक कारवाईची मागणी


लेवाजगत न्यूज चिनावल-चिनावल गावातील जुन्या सावदा रस्त्यालगत असलेल्या खेमा  पाटील यांच्या शेतात घडलेली घटना संपूर्ण परिसराला हादरवणारी आहे. रात्रीच्या अंधारात काही अज्ञात व्यक्तींनी तब्बल ३५०० केळी झाडे कापून टाकल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकतीच लागवड झालेली ही केळीची बाग एका रात्रीत उद्ध्वस्त करण्यात आल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.


3500 banana trees uprooted by unknown persons in Chinaval, causing damage worth lakhs of rupees


 खेमचंद कामा पाटील यांनी मे महिन्यात कर्ज काढून केळी लागवडीसाठी बेणे, ठिबक सिंचन व आंतरमशागत यासाठी मोठा आर्थिक खर्च केला होता. मात्र १० जुलैच्या रात्री झालेल्या या विकृत कृत्यामुळे त्यांच्या कष्टावर अक्षरशः पाणी फिरले.


या घटनेनंतर एनएसयूआयचे राज्य सरचिटणीस धनंजय चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी तात्काळ सावदा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या घटनेतील दोषींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी केली. श्री. चौधरी यांनी ही घटना “अत्यंत दुर्दैवी असून शेतकऱ्याला खचवणारी” असल्याचे सांगितले.


घटनास्थळी सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, पोलीस कर्मचारी मजहर तडवी व इतरांनी तातडीने धाव घेऊन पाहणी व पंचनामा केला. शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून गु.र.नं. १७४/२५, गट नं. ११४/४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या घटनेबाबत चिनावल मंडळ अधिकारी अमोल चौधरी यांनी तहसीलदार रावेर यांना माहिती दिली असून, अज्ञात आरोपींविरोधात कडक कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी एकत्र येत तीव्र संताप व्यक्त केला असून, असे अमानवी कृत्य करणाऱ्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.