Header Ads

Header ADS

आमदार अमोल जावळे यांनी केली तात्काळ आमोदा पुलाजवळ भीषण बस अपघाताची पाहणी


Serious bus accident near Amoda bridge; MLA Amol Javale conducted an immediate inspection



आमोदा पुलाजवळ भीषण बस अपघात;आमदार अमोल जावळे यांनी केली तात्काळ पाहणी


लेवाजगत न्यूज प्रतिनिधी आमोदा:- सावदा-भुसावळ रस्त्यावरील यावल तालुक्यातील आमोदा गावाजवळ आज सकाळच्या सुमारास भीषण अपघात घडला. इंदोरवरून जळगावकडे निघालेली प्रवाशांनी भरलेली श्री गणेश लक्झरी खासगी बस पुलावरून खाली कोसळली. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Serious bus accident near Amoda bridge; MLA Amol Javale conducted an immediate inspection


घटनेची माहिती मिळताच आमदार अमोलभाऊ जावळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातग्रस्त बसची पाहणी करून प्रवाशांची विचारपूस केली. गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याकडे लक्ष वेधत त्यांनी ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली आहे.




आमदार जावळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) अभियंता श्री. विश्वानंद तायडे यांना घटनास्थळी बोलावले आणि अपघाताच्या कारणांचा सविस्तर आढावा घेतला. रस्त्यावरील तांत्रिक दोष, चुकीचे वळण, साईन बोर्ड व रिफ्लेक्टरची कमतरता, तसेच सुरक्षा कठड्यांची आवश्यकता यावर सखोल चर्चा झाली.


यावेळी आमदार जावळे यांनी अधिकाऱ्यांना ठाम शब्दांत सांगितले, "ज्या तांत्रिक त्रुटींमुळे अपघात होत आहेत, त्या दूर करण्यासाठी पुढील आठ दिवसांत ठोस उपाययोजना करा. अन्यथा याप्रकरणी गाठ माझ्याशी आहे."


दररोज या मार्गावर शेकडो प्रवासी प्रवास करत असतात. त्यामुळे भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी रस्त्यावरील सुरक्षाव्यवस्था तातडीने सुधारण्याचे आवाहन त्यांनी संबंधित यंत्रणेला केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.