सावदा येथे आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा उत्साहात संपन्न
सावदा येथे आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा उत्साहात संपन्न
सावदा (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) –येथील श्रीराम मंदिर वाणी समाज संघाच्या वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून पारंपरिक पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सालाबादप्रमाणे यंदाही सकाळी मंदिरात श्री अशोक बालाजी वाणी यांच्या हस्ते विधीवत पूजा व अभिषेक करून या भक्तिमय सोहळ्याची सुरुवात झाली.
सायंकाळी मंदिरापासून निघालेली पालखी गावातील प्रमुख मार्गांवरून भक्तिभावाने व सनई-चौघड्याच्या गजरात मार्गक्रमण करत पुढे सरकली. अनेक ठिकाणी ग्रामस्थांकडून पालखीचे पुष्पवृष्टीसह स्वागत करण्यात आले.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर ट्रस्टी अनिल मदन वाणी, अरविंद रामभाऊ वाणी, पद्माकर बालाजी वाणी, सुनील मदन वाणी, विनोद सुदाम वाणी, तसेच महेंद्र वाणी, सुनील वाणी, नितीन वाणी, विशाल वाणी, संदीप वाणी आणि श्रीकांत वाणी यांनी विशेष परिश्रम घेतले.
या भक्तिमय सोहळ्यात वाणी समाजाचे अनेक बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सावदा पोलीस प्रशासनाने योग्य बंदोबस्त ठेवून कार्यक्रम शांततेत पार पडला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत