"मेरा काम मेरी पहचान" या विषयावर जे. टी. महाजन पॉलिटेक्निक, फैजपूर येथे जनजागृती कार्यक्रम
"मेरा काम मेरी पहचान" या विषयावर जे. टी. महाजन पॉलिटेक्निक, फैजपूर येथे जनजागृती कार्यक्रम
लेवा जगत न्यूज, फैजपूर – महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत "मेरा काम मेरी पहचान" या उपक्रमांतर्गत जे. टी. महाजन पॉलिटेक्निक, फैजपूर येथे विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थी व नागरिकांमध्ये पर्यावरण विषयक जाणीव वाढवणे, स्वावलंबनाचे महत्व पटवून देणे, तसेच सामाजिक बांधिलकी जोपासणे हा होता.
या कार्यक्रमात मिशनचे सहायक श्री. योगी गुरुप्रीत सिंग यांनी उपस्थितांना मिशनची सविस्तर माहिती दिली. त्यांनी “मेरा पेड मेरी जिम्मेदारी”, वर्षा जलसंवर्धन, जैविक शेती, बीज रोपण आणि रोपे वाढवण्याचे महत्व पटवून दिले. त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत, पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. प्रदीप राणे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना या मोहिमेचे महत्त्व सांगताना, स्वतःपासून सुरुवात करून समाजात बदल घडवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमानंतर वृक्षारोपण करण्यात आले आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांना मार्गदर्शनही करण्यात आले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेण्याची प्रेरणा या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाल्याचे अनेकांनी सांगितले.
— लेवा जगत न्यूज



कोणत्याही टिप्पण्या नाहीत