Contact Banner

पती प्रांजल खेवलकर यांच्या अटकेनंतर २४ तासांनी रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया; "कायद्यावर माझा पूर्ण विश्वास आहे"

 

Rohini Khadse's reaction 24 hours after husband Pranjal Khewalkar's arrest; "I have full faith in the law"

पती प्रांजल खेवलकर यांच्या अटकेनंतर २४ तासांनी रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया; "कायद्यावर माझा पूर्ण विश्वास आहे"


 लेवा जगत न्यूज सावदा- पुणे येथील रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रांजल खेवलकर यांच्या अटकेनंतर, त्यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या महिला शाखेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी तब्बल २४ तासांनी सोशल मीडियावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.


कुठलाही थेट आरोप किंवा स्पष्टीकरण न देता, त्यांनी कायद्यावर-पोलिस यंत्रणेवर विश्वास ठेवत संयमी भूमिका घेतली आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर त्यांनी लिहिले आहे:


 "कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल!"

"जय महाराष्ट्र!"

हे पण वाचा -रोहिणी खडसे यांची फेसबुक पोस्ट -https://www.facebook.com/share/1B6zf2DMMQ/



या मोजक्या पण स्पष्ट पोस्टने अनेक चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राजकीय व सामाजिक वर्तुळात प्रकरणावरून उलटसुलट चर्चा सुरू असतानाच, रोहिणी खडसे यांनी शांतता राखत कायद्यावर विश्वास व्यक्त केला आहे.





कोण आहेत प्रांजल खेवलकर?


प्रांजल खेवलकर हे रोहिणी खडसे यांचे पती असून,  पुणे येथील रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली होती. या प्रकरणातील तपास पोलीस आणि संबंधित यंत्रणा करत असून, सोशल मीडियावर त्यासंदर्भात अनेक चर्चांना उधाण आले आहे


    प्रांजल खेवलकर यांच्या अटकेनंतर राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया उमटत असतानाच, रोहिणी खडसे यांनी दिलेली प्रतिक्रिया संयमाची आणि कायद्यातील विश्वासाची आहे.






लेवा जगत न्यूज या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून वाचकांना ताजी, सत्य आणि विश्वासार्ह माहिती देत राहील.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.