Header Ads

Header ADS

दिघोडे गावची सुवर्ण कन्या अवनी कोळीची गगनभरारी – आशियाई शुटिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

Dighode-village's-golden-girl-Avni-Koli-singing-in-the-Indian-team-for-Asian-Shooting-Competition


दिघोडे गावची सुवर्ण कन्या अवनी कोळीची गगनभरारी – आशियाई शुटिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

लेवाजगत न्यूज प्रतिनिधी उरण : सुनिल ठाकूरनेमबाजी या अचूकतेच्या क्रीडा प्रकारात रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील दिघोडे गावच्या अवनी अलंकार कोळी हिने ऐतिहासिक भरारी घेतली आहे. डबल ट्रॅप शॉटगन प्रकारात तिची भारतीय ज्युनिअर महिला संघात निवड झाली असून ती १४ ते २८ ऑगस्ट २०२५ दरम्यान कझाकिस्तान येथे होणाऱ्या आशियाई शुटिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.

सामान्य घरातून असामान्य यशाकडे…





सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेली अवनी कोळी ही फक्त घरापुरती मर्यादित राहिली नाही, तर तिच्या वडिलांनी तिला भांडी ऐवजी बंदूक हातात दिली. अलंकार कोळी हे स्वतः राष्ट्रीय नेमबाज आणि प्रशिक्षक असून त्यांनी आपल्या कन्येच्या सुप्त कौशल्याला दिशा दिली. पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या या खेळात अवनीने धाडसाने प्रवेश करत अनेक अडथळ्यांवर मात केली.

महागड्या साधनांशिवायही कमालीची कामगिरी

शॉटगन शुटिंगसारखा महागडा आणि राजघराण्यांचा खेळ म्हणवला जाणारा खेळ अवनीने केवळ सामान्य किट वापरत करत यशाच्या शिखरावर झेप घेतली. ती आजवर राज्य, झोनल, प्री-नॅशनल, आणि नॅशनल पातळीवरील अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची लयलूट केली आहे.

प्रशिक्षण व सुरुवात

अवनीने वयाच्या १२व्या वर्षी सिद्धांत रायफल अँड पिस्तूल शुटिंग क्लब, रायगड येथे किशन खारके व श्रीमती शीला कानुगो यांच्या मार्गदर्शनाखाली नेमबाजी सुरू केली. नंतर २०२३ मध्ये छत्रपती स्टेडियम, बालेवाडी येथे रालस्टोन कोयलो यांच्याकडून डबल ट्रॅप प्रकाराचे प्रशिक्षण घेतले.

कौटुंबिक पाठिंबा आणि शैक्षणिक प्रवास

अवनीच्या यशामागे तिची आई कविता यांचे खंबीर पाठबळ असून तिचा लहान भाऊ अर्णव देखील नेमबाजीत उल्लेखनीय कामगिरी करत आहे. अवनीचे शिक्षण IMS उलवे व वीर वाजेकर कॉलेज, फुंडे उरण येथे सुरू आहे. सध्या ती एफ.वाय. बी.एस.सी. मध्ये शिक्षण घेत आहे.

संपूर्ण गावाचा अभिमान

अवनीच्या यशामुळे संपूर्ण दिघोडे गावात आनंदाचे वातावरण आहे. गावचे सरपंच कीर्तिनिधी ठाकूर, मुसा काझी, साईम देशमुख, अली रझा सय्यद आणि IMS उलवेच्या मुख्याध्यापिका गौरी शाह यांचे मोलाचे योगदान तिच्या घडण्यात आहे. अवनीच्या या दैदिप्यमान कामगिरीसाठी सर्वत्र तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


🇮🇳 लेवाजगत कडून अवनीला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.