Header Ads

Header ADS

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात ७३ अर्जांची नोंद

District-level-democracy-day-73-applications-registered


जिल्हास्तरीय लोकशाही दिनात ७३ अर्जांची नोंद

जळगाव, दि. ७ (जिमाका वृत्तसेवा) – जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचा कार्यक्रम आज दिनांक ७ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता अल्पबचत भवन, जळगाव येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमात नागरिकांकडून एकूण ७३ अर्ज प्राप्त झाले.

या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री माळी, उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन) विजयकुमार ढगे, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, तहसीलदार (संजय गांधी योजनांतर्गत) डॉ. उमा ढेकळे, नायब तहसीलदार (करमणूक शाखा) राहुल सोनवणे, तसेच इतर शाखांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लोकशाही दिनाच्या निमित्ताने नागरिकांनी विविध विभागांसंदर्भात प्रश्न मांडले असून, त्याचे तात्काळ निराकरण करण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. प्राप्त अर्जांचा विभागवार आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.