जे.टी.महाजन पॉलिटेक्निक, फैजपूर येथे मोफत "ऑप्शन फॉर्म" भरण्यासाठी विशेष सुविधा
जे.टी.महाजन पॉलिटेक्निक, फैजपूर येथे मोफत "ऑप्शन फॉर्म" भरण्यासाठी विशेष सुविधा
लेवाजगत न्यूज फैजपूर – एस.एस.सी. (इयत्ता १०वी) नंतर प्रथम वर्ष पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. संचालक तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या सूचनेनुसार, ज्यांनी आधीच ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीचा (CAP Round 1) ऑप्शन फॉर्म भरायचा कालावधी ८ जुलै ते १० जुलै २०२५ असा आहे.
विद्यार्थ्यांनी https://poly25.dtemaharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपापल्या पसंतीनुसार अभ्यासक्रम व संस्था निवडून ऑप्शन फॉर्म भरावा.
विशेष सूचना: जे विद्यार्थ्यांना ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरताना तांत्रिक किंवा अन्य अडचणी येत असतील, त्यांच्यासाठी जे. टी. महाजन पॉलिटेक्निक, फैजपूर येथे विनामूल्य सहाय्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
संस्था प्रमुख प्राचार्य श्री. पी. एम. राणे व प्रवेश प्रक्रिया समिती यांनी विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
संपर्क: जे. टी. महाजन पॉलिटेक्निक, फैजपूर
अधिक माहितीसाठी संस्थेला भेट द्या किंवा अधिकृत क्रमांकावर संपर्क साधा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत