सावदा नगरपरिषदेच्या वतीने पावसाळी मुरुम भराव काम सुरू -नागरिकांना दिलासा
सावदा नगरपरिषदेच्या वतीने पावसाळी मुरुम भराव काम सुरू -नागरिकांना दिलासा
लेवाजगत न्यूज सावदा, जि. जळगाव-सावदा नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील विविध प्रभागांमध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुरुम टाकण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आले आहे. पावसात कच्च्या रस्त्यांवर चिखल, पाणी साचणे आणि वाहनांची व नागरिकांची ये-जा अडथळाग्रस्त होणे, या तक्रारींचा विचार करता ही कामे हाती घेण्यात आली आहेत.
सदर काम "माझी वसुंधरा अभियान 6.0" तसेच "स्वच्छ सर्वेक्षण 2025" अंतर्गत करण्यात येत असून, मुख्याधिकारी श्री. भूषण वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेचे अभियंते व कर्मचारी हे कामे मार्गी लावत आहेत.
शहरातील अनेक भागांमध्ये रस्ते अद्यापही कच्चे आहेत. त्यामुळे पावसात चिखल तयार होऊन नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर सावदा नगरपरिषदेकडून पुढाकार घेत रस्त्यांवर मुरुम भरावाचे काम सुरू करण्यात आले आहे.
आतापर्यंत मुरुम टाकण्यात आलेले प्रमुख भाग पुढीलप्रमाणे:पवन नगर,निमजाई माता नगर,सुगंगा नगर,बिलाल नगर,पन्नापीर नगर,अमोल नगर,साई पार्क,ख्वाजा नगर,रजा नगर,सहजानंद नगर,सोमेश्वर नगर या भागांतील प्रत्यक्ष छायाचित्रांमधून काम सुरू असल्याचे दृश्यमान दिसत असून, नागरिकांना दिलासा मिळत आहे. ट्रॅक्टर, मुरुम व कामगार यांच्या सहाय्याने ही कामे नियोजनपूर्वक पार पाडली जात आहेत.
नगरपरिषदेचा नागरिकांना संदेश:
"कामाच्या कालावधीत नागरिकांनी संयम बाळगावा, व सहकार्य करावे. उर्वरित प्रभागांमध्ये देखील मुरुम टाकण्याचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येईल. सावदा नगरपरिषद नागरिकांच्या सुविधा व स्वच्छतेसाठी कटिबद्ध आहे."
नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, रस्त्यांची अवस्था सुधारल्यास शालेय विद्यार्थी, वृद्ध नागरिक व दैनंदिन कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
---
✍️ प्रतिनिधी – लेवाजगत न्यूज, सावदा जाहिरात करिता संपर्क साधा-८९८३६८९८४४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत