आमदार अमोलभाऊ जावळे यांची तत्परता — दिव्यांग युवकाच्या व्यथेला मिळाले समाधान
आमदार अमोलभाऊ जावळे यांची तत्परता — दिव्यांग युवकाच्या व्यथेला मिळाले समाधान
लेवाजगत न्यूज कुंभारखेडा, ता. रावेर | प्रतिनिधी-रावेर तालुक्यातील कुंभारखेडा येथे नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास रावेरचे लोकप्रिय आमदार मा. अमोलभाऊ जावळे स्वतः उपस्थित होते. शिबिरादरम्यान एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला, जो सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरतो आहे.
शिबिरात गौरव छोटू भालेराव या दिव्यांग युवकाने आपल्या अडचणी घेऊन आमदार अमोलभाऊ जावळे यांची भेट घेतली. त्याच्या व्यथा ऐकताच आमदारांनी विलक्षण संवेदनशीलता आणि तत्परता दाखवत, तात्काळ प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना पाचारण केले.
आमदार जावळे यांनी फैजपूरचे उपविभागीय अधिकारी मा. बबनराव काकडे आणि रावेरचे तहसीलदार मा. बंडू कापसे यांना त्वरित घटनास्थळी बोलावले. आमदारांच्या सूचनेनुसार अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत निराधार अनुदान योजनेअंतर्गत गौरव भालेराव यांचा अर्ज मंजूर केला.
योजनेंतर्गत मंजुरी मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे, तहसीलदार बंडू कापसे, कुंभारखेड्याचे सरपंच भरत बोंडे, भाजपा तालुकाध्यक्ष अँड. प्रा. सूर्यकांत देशमुख, कार्यकर्ते कपिल चौधरी व इतरांनी गौरव भालेराव यांच्या घरी जाऊन मंजुरीचे प्रमाणपत्र त्याच्या हस्ते सुपूर्द केले.
या तातडीच्या निर्णयामुळे गावात आणि परिसरात समाधानाची लाट पसरली असून, समाधान शिबिर म्हणजे केवळ औपचारिकता नसून खऱ्या अर्थाने नागरिकांच्या समस्या सोडविणारे उपक्रम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
ग्रामस्थांनी आमदार अमोलभाऊ जावळे यांची तत्परता, संवेदनशीलता आणि प्रशासनाशी समन्वय साधून घेतलेली कृती याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले असून, असे प्रतिनिधित्व म्हणजे खऱ्या अर्थाने जनतेचा लोकप्रतिनिधी काय असतो, याचे उत्तम उदाहरण असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत