रावेर तालुक्यात अफवेमुळे जडीबुटी विक्रेत्यांना बेदम मारहाण; पोलीस हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला
लेवाजगत न्यूज, सावदा (ता. रावेर) – रावेर तालुक्यातील मुंजलवाडी, कुसुंबा आणि लोहारा या गावांमध्ये फिरतीवर असलेल्या जडीबुटी विक्रेत्यांचा वाद झाल्याने अफवेमुळे जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना हिंसक वळण घेण्याआधीच पोलीस हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, सिरसा (हरियाणा) येथील जडीबुटी विक्रेते – जस्सानाथ पुनुनाथ (वय ६०) व मोनूनाथ जस्सानाथ (वय २०) – सध्या मध्यप्रदेशातील बुरहानपूर येथे राहत असून, ते जडीबुटी विक्रीसाठी मुंजलवाडीत आले होते. त्यांनी एका ग्रामस्थाची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर अफवा पसरली यानंतर जमावाने त्यांना मारहाण केली.
ते मारहाणी पासून वाचून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना HR13E6516 क्रमांकाच्या गाडीतून निघाले, मात्र कुसुंबा आणि लोहारा येथे पुन्हा त्यांना अडवून मारहाण करण्यात आली. या घटनेदरम्यान त्यांच्या गाडीची तोडफोड देखील झाली.
पोलीस वेळेवर पोहोचले; तणाव नियंत्रणात
घटनेची माहिती मिळताच सावदा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि दोघांनाही सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे संभाव्य गंभीर परिणाम टळला. सध्या परिसरात तणावाचे वातावरण आहे.
दोन तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
या प्रकरणात दोन स्वतंत्र तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका तक्रारीत इकबाल मोहंमद तडवी यांनी वाहनाचा कट लागल्याचा उल्लेख केला असून दुसरी तक्रार जडीबुटी विक्रेत्यांच्या वतीने मारहाण करणाऱ्यांविरोधात दाखल होणार आहे.
"अफवांवर विश्वास ठेवू नका" – पोलिसांचे आवाहन
अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी लेवाजगत शी बोलताना सांगितले, "जस्सानाथ आणि मोनूनाथ हे साधू नसून हरियाणामधून आलेले आहेत. सध्या ते मध्यप्रदेशातील बुरहानपूर येथे राहून जडीबुटी विक्रीचे काम करतात. कोणतीही अफवा पसरवू नका आणि अशा अफवांवर विश्वास ठेवू नये."
सर्व नागरिक बंधू-भगिनींना आवाहन करण्यात येते की कोणीही या घटनेबाबत अफवा पसरवू नये हे लोक जडीबुटी विकणारे होते. हरियाणा येथील असून ते सध्या बऱ्हाणपूर येथे रहिवास करतात तरी अफवा पसरवू नये सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील सावदा पोलीस स्टेशन

कोणत्याही टिप्पण्या नाहीत