Contact Banner

"औषध विकणाऱ्या वडील–मुलावर अमानुष मारहाण; जमावाविरुद्ध गुन्हा"


"Inhumane beating of father-son who sold drugs; crime against the community"




 "औषध विकणाऱ्या वडील–मुलावर अमानुष मारहाण; जमावाविरुद्ध गुन्हा"


लेवाजगत न्यूज, सावदा (ता. रावेर) | रावेर तालुक्यातील लोहारा गावाजवळ रविवारी सायंकाळी अफवेमुळे उसळलेल्या संतप्त जमावाने हरियाणामधून आयुर्वेदिक औषधी विक्रीसाठी आलेल्या वडील–मुलावर अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून सावदा पोलिसांनी अज्ञात १० ते १५ जणांविरुद्ध विविध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.







फिर्यादी जस्सानाथ पुनुनाथ (वय ६०, रा. सुलतानपुरिया, ता. राणिया, जि. सिरसा, हरियाणा) हे आपल्या २० वर्षीय मुलासह रसलपूर गावात आयुर्वेदिक औषध विक्रीसाठी आले होते. औषध विक्रीदरम्यान एका स्थानिक व्यक्तीस दिलेल्या औषधावरून वाद निर्माण झाला. वाद टाळण्यासाठी त्यांनी तात्काळ स्विफ्ट कारने कुसुंबा गावाच्या दिशेने प्रस्थान केले.


प्रवासादरम्यान लोहारा गावाजवळ त्यांच्या कारने एका स्थानिकास सौम्य धक्का दिला. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी दोघांचा पाठलाग करत त्यांना शेतामध्ये घेरले. तेथे आधीच जमलेला जमाव त्यांच्यावर लाकडी दांडक्यांनी व लाथाबुक्क्यांनी तुटून पडला. या मारहाणीत वडील जस्सानाथ व त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात अज्ञात जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे हे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत शांतता प्रस्थापित केली असून, सध्या परिसरात शांतता आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.